गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली सोशल मीडिया कंपनी म्हणजे ट्विटर. युजर्सच्या सोयीसाठी कंपनी सतत काही ना काही बदल करत असते. एप्रिल महिन्यात एलॉन मस्क कंपनीच्या सीईओ पदावरून पाय उतार झाले. त्यांनी ती जबाबदारी लिंन्डा यांच्या खांद्यावर ठेवली. या नव्या सीईओने आयटी नियमांचे पालन करत एक मोठी कारवाई केली आहे.
किती जणाचे पंख कापले
एका पक्ष्याचा लोगो असणाऱ्या ट्विटरने २५ लाख ५१ हजार ६२३ अकाऊंट्सवर बंदी घातली आहे. ३० दिवसांच्या कालावधीत भारतीय युजर्सवर ही कारवाई करण्यात आली आहे.
(हेही वाचा – चुकीच्या नंबरवर मोबाईल रिचार्ज केला, तरीही घाबरू नका)
छळाचा आकडा प्रथम
ट्विटरने मार्च-एप्रिल महिन्याचा मासिक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार २६ मार्च ते २५ एप्रिल या महिन्याभराच्या काळात कंपनीने भारतीयांकडून एकूण १५८ तक्रारी प्राप्त केल्या आहेत. यातल्या बहुतांश तक्रारी या गैरवर्तन किंवा छळाशी संबंधित आहेत.
तक्रारींचे सविस्तर आकडे
गैरवर्तन किंवा छळ – ८३
संवेदनशील अॅडल्ट कंटेंट – ४१
द्वेषपूर्ण कंटेंट – १९
बदनामी – १२
व्हॉट्सअॅपच्या मागोमाग ट्विटर
आयटी नियम २०२१ नुसार ५० लाखांपेक्षा जास्त युजर्स असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मासिक अहवाल सादर करणे अनिवार्य आहे. त्यानुसार व्हॉट्सअॅपने १ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान ७४ लाख भारतीय अकाउंट्स बॅन केले आहेत. हे अकाउंट्स नवीन नियमांचे पालन करत नव्हते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community