ट्विटरचा सर्व्हर डाऊन! फेसबुक-इन्स्टावरही अडचणी, युजर्स झाले हैराण

186

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आपण दैनंदिन जीवनात करत असतो. त्यामुळे सोशल मीडिया ठप्प झाल्यावर जगभरातील कोट्यावधी युजर्स हैराण होतात. ९ फेब्रुवारीच्या सकाळी असाच अनुभव अनेकांना आला. यूएसमधील वापरकर्त्यांकडून याबाबत सर्वाधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याचा अनुभव जगभरातील वापरकर्त्यांना आला आणि एकच तारांबळ उडाली.

( हेही वाचा : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभा-यात अमरनाथ प्रकटल्याचा दावा खोटा; मंदिर पुजा-यांचा संताप )

ट्विटरचा सर्व्हर डाऊन

ट्विटरचा सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यावर लॉग इन करताना समस्या येत होत्या. Tweetdeck सुद्धा काम करत नसल्याने वापरकर्त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. याशिवाय अनेक युजर्सनी इन्स्टा आणि फेसबुक वापरण्यात सुद्धा अडचणी येत असल्याच्या तक्रारी मेटाकडे नोंदवल्या आहेत.

जे वापरकर्ते ट्विटरवर दैनंदिन ट्वीट करत होते त्यांना एक पॉप अप प्राप्त झाला ज्यामध्ये तुम्ही तुमची ट्विटची मर्यादा ओलांडली आहे असा एरर आल्याचे समोर आले दरम्यान ट्विटरच्या सपोर्ट टिमला ही तांत्रिक अडचण समजली असून यावर काम सुरू असल्याचे स्पष्टिकरणी ट्विटरकडून देण्यात आले आहे.

तुमच्यापैकी काहींच्या अपेक्षेप्रमाणे ट्विटर काम करत नसेल तर तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. आम्ही जागरुक आहोत आणि ही अडचण दूर करण्यासाठी काम करत आहोत असे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.