आता ट्विटरवर केलेली चूक पडणार नाही महागात!

139

ट्विटर वापरकर्त्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम या अ‍ॅपप्रमाणेच ट्विटरवर सुद्धा ट्वीट एडिट करण्याचा ऑप्शन द्यावा अशी मागणी अनेक युजर्स करत होते. यावर ट्विटरचे म्हणणे आहे की, एडिट फिचरवर (Twitter Edit Feature) गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. आता येत्या काही महिन्यांमध्ये काही निवडक अकाऊंटवर या फिचरची चाचणी करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : विक्रांत युद्धनौकेच्या नावावर 58 कोटींची रक्कम लाटली राऊतांचा सोमय्यांवर देशद्रोहाचा आरोप!)

ट्विटर एडिट फिचरवर काम करत असून, आता आपल्याला आपले ट्वीट एडिट करता येणार आहेत. ट्विटर ब्लू सब्सक्राइबर्सच्या ( Twitter blue subscribers) अकाऊंटवर या फिचरची चाचणी करण्यात येणार आहे.

कसं असेल ‘एडिट फिचर’?

जर तुम्ही ट्विटर युजर असाल तर तुम्हाला हे माहितच असेल की ट्विटरवर ट्वीट एडिट करण्याचा म्हणजेच दुरुस्त करण्याचा पर्याय नाही. मात्र संभाव्य एडिट फिचरमुळे युजर्सना केलेले ट्वीट दुरुस्त करता येईल किंवा त्यामध्ये बदल करता येईल.

5 एप्रिल रोजी इलॉन मस्क यांनी ट्विटरवर एक पोल टाकला होता, या सर्वेक्षणात, 73.6 टक्के ट्विटर वापरकर्त्यांनी एडिट बटणासाठी YES मान्य केले आहे, तर 26.4 टक्के लोकांनी याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.