युनियन बँक ऑफ इंडियाने केली मेटाव्हर्स लाउंज आणि ओपन बँकिंग सँडबॉक्स एन्व्हायर्नमेंटची घोषणा  

130

युनियन बँक ऑफ इंडियाने मुंबईतील एका कार्यक्रमात मेटाव्हर्स लाउंज आणि ओपन बँकिंग सँडबॉक्स एन्व्हायर्नमेंटची घोषणा केली. सुरुवातीच्या टप्प्यात, बँकेच्या मेटाव्हर्स व्हर्च्युअल लाउंज, युनि-व्हर्समध्ये बँकेच्या उत्पादनांची माहिती आणि संबंधित व्हिडिओ उपलब्ध असतील. युनि-व्हर्स ग्राहकांना पूर्णपणे अनोखा बँकिंग अनुभव देईल आणि ग्राहक या आभासी लाउंजभोवती फिरत असताना बँकेच्या ठेव योजना, कर्ज, सरकारी कल्याणकारी योजना, डिजिटल उपक्रम इत्यादींचा शोध घेऊ शकतात. हा उपक्रम टेक महिंद्राच्या भागीदारीत सुरू करण्यात आला आहे.

( हेही वाचा : २५०० रुपयांची दाढी आणि १०० कोटींची खंडणी…)

युनियन बँक ऑफ इंडियाने ओपन बँकिंग सँडबॉक्स एन्व्हायर्नमेंट देखील लाँच केले, ज्याद्वारे बँक नवीन बँकिंग उत्पादने विकसित आणि मार्केट करण्यासाठी आपल्या फिन टेक आणि स्टार्ट-अप भागीदारांसोबत जवळून काम करेल. सँडबॉक्स एन्व्हायर्नमेंट फिन टेक आणि डेव्हलपर यांना त्यांच्या कल्पना साकार करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करून त्यांना सक्षम बनवते.

युनियन बँक ऑफ इंडियाच्या एमडी आणि सीईओ, मनिमेखलाई यांनी सांगितले, बँकेने मेटाव्हर्ससह सर्व-नवीन तंत्रज्ञान स्वीकारले आहे, ज्यामुळे  ग्राहकांच्या बँकिंग अनुभवाचा स्तर उंचावतो. पुढे, मुक्त बँकिंग वातावरणाकडे वाटचाल करत, बँकेने सँडबॉक्स लाँच केला आहे, जो नवीन मार्ग उघडेल तसेच तृतीय पक्ष विकासकांच्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणेल. मेटाव्हर्स आणि सँडबॉक्स लाँच करून ग्राहकांना सर्व-नवीन बँकिंग अनुभव देण्याच्या आपल्या वचनावर युनियन बॅंक ठाम आहे असे, कार्यकारी संचालक नितेश रंजन यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.