कोरोना महामारी जवळ-जवळ संपुष्टात येत आहे आणि भारतात प्रबळ आर्थिक सुधारणा दिसून येत आहेत. या प्रबळ आर्थिक वाढीसह बँकेने जून तिमाहीसाठी उत्तम निष्पत्ती देखील दाखवल्या आहेत, जेथे तिमाहीत आमचा निव्वळ नफा ३२ टक्क्यांनी वाढला आणि निव्वळ व्याज उत्पन्न ८.१ टक्क्यांनी वाढले. अशी माहिती युनियन बँक ऑफ इंडियाच्या एमडी आणि सीईओ श्रीम. ए. मणीमेखलाई यांनी दिली आहे.
डिजिटलायझेशनवर भर
चालू तिमाहीत वाढलेल्या विविध कार्यसंचालन खर्चांमुळे आमचा तिमाही-ते-तिमाही नफा कमी झाला आहे, पण आम्ही वार्षिक स्थिर वाढ दाखवली आहे आणि आम्हाला खात्री आहे की, आगामी तिमाहीत म्हणजे सप्टेंबर २०२२ ला समाप्त होणा-या तिमाहीत आम्ही उत्तम वाढीची नोंद करू. दरम्यान, सध्या आम्ही मुख्यत्वे डिजिटलायझेशनवर भर देत आहोत. आम्ही मेटाव्हर्सची मूळ आवृत्ती गेल्या तिमाहीत लॉन्च केली होती आणि आगामी तिमाहीत ती अधिक परस्परसंवादी बनवून त्याची एक उत्तम आवृत्ती लॉन्च करू इच्छितो. अधिक पुढे जात आम्ही ११ नोव्हेंबर २०२२ रोजी आमच्या स्थापना दिनी जवळपास २५० हून अधिक वैशिष्ट्यांसह आमच्या मोबाइल बँकिंग अॅपची अपग्रेड केलेली आवृत्ती लॉन्च करणार आहोत. असेही त्यांनी सांगितले.