
-
ऋजुता लुकतुके
केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून यंदा सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. आणि तिसऱ्या मोदी सरकारमध्ये त्यांनी त्याचं लाडकं असलेलं रस्ते बांधणी खातंही टिकवून ठेवलं आहे. गडकरी यांनी लोकसभा निवडणूक तब्बल ६.५ लाख मताधिक्याने जिंकली होती. निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवाराला आपल्या एकूण स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील निवडणूक आयोगासमोर सादर करावा लागतो. यात वैयक्तिक आणि जोडीदाराच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा तपशील लेखी सादर करायचा असतो. त्यानुसार, नितीन गडकरी यांनी मार्च २०२४ रोजी आपली एकूण मालमत्ता एका प्रतिज्जापत्राद्वारे आयोगाकडे सादर केली आहे. (Nitin Gadkari Net Worth)
आणि त्यानुसार, गडकरींची एकूण मालमत्ता ही ६ कोटींच्या घरात आहे. शिवाय त्यांच्या पत्नीकडेही ७.९ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. नितीन गडकरी, त्यांची पत्नी कांचन गडकरी (Kanchan Gadkari) आणि त्यांच्या हिंदू अविभक्त कुटुंबीयांकडे एकूण रोख रक्कम ही फक्त ४५,००० रुपयांइतकी होती. तर विविध बँकांमध्ये नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नीच्या नावे ४९ लाख, १६ लाख आणि १५ लाख रुपयांच्या मुदतठेवी आहेत. (Nitin Gadkari Net Worth)
(हेही वाचा – Allu Arjun Net Worth : पुष्पा – स्टार अल्लू अर्जुनकडे आहे जवळ जवळ ५०० कोटींची संपत्ती)
विविध शेअर आणि म्युच्युअल फंडात नितीन गडकरी यांची ३ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. तर त्यांच्या पत्नीचा पोर्टफोलिओ हा २० लाखांचा आहे. कांचन गडकरी यांनी एलआयसी व तत्तम विमा पॉलिसींमध्ये १४ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. गडकरी आणि कुटुंबीयांनी विविध उद्योगांमध्ये ५४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आणि यात नितीन गडकरी यांची गुंतवणूक ही १८ लाख रुपयांची आहे. नितीन गडकरी यांच्याकडे असलेल्या गाड्यांची किंमत ही २९ लाख रुपये इतकी आहे. तर कांचन गडकरी यांच्या गाड्यांची किंमत १४ लाख रुपये इतकी आहे.
दोघांकडे मिळून ८६ लाख रुपयांचे दागिने आहेत. तर नितीन गडकरी यांची मालमत्ता १.३ कोटी रुपयांची आणि कांचन गडकरी यांची मालमत्ता १.२ कोटींची आहे. याव्यतिरिक्त दोघांच्या नावावर नागपूर परिसरात घरं आणि शेतजमीनही आहेत. कांचन गडकरी यांच्या नावावर १.५ कोटी रुपयांची शेतजमीन आहे. तर गडकरी कुटुंबीयांकडे असलेल्या जमिनीची किंमत १.७ कोटी रुपये इतकी आहे. नितीन गडकरी यांचं राहतं घर त्यांच्या नावावर असून त्याची किंमत ४.९ कोटी रुपये इतकी आहे. तर कांचन गडकरी यांच्या नावावर नागपूरमध्येच असलेलं घर ५.४ कोटी रुपयांचं आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या नावावर असलेली स्थावर मालमत्चा ही ४.९४ कोटी रुपये तर पत्नी कांचन गडकरी यांच्या नावावर असलेली स्थावर मालमत्ता ७.९ कोटी रुपये इतकी आहे. गडकरी कुटुंबीयांकडे असलेली स्थावर मालमत्ता ११.०९ कोटी रुपयांची आहे. (Nitin Gadkari Net Worth)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community