जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त जेजे रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम!

206

३० जानेवारी हा दिवस जागतिक कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा केला  जातो. कुष्ठरोग निर्मूलन करण्यासाठी राज्यात प्रयत्न केले जात असून, ३० ते १३ फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधत जेजे रुग्णालयात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठरोग रुग्णालयाला भेट देत अनेक उपक्रम राबविले.

( हेही वाचा : बीडीडीला न्याय! सरकारी कर्मचाऱ्यांना कधी? )

पथनाट्यामार्फत रुग्णांचे प्रबोधन

जानेवारी महिन्याचा चौथा रविवार दरवर्षी जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा परिचर्या महाविद्यालय सर ज.जी समूह रुग्णालय मुंबई यांच्या वतीने जागतिक कुष्ठरोग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त चतुर्थ वर्षीय बेसिक बीएस्सी नर्सिंग विद्यार्थ्यांनी, अकवर्थ कुष्ठरोग रुग्णालय (Acworth Muncipal Hospital for Leprosy, wadala) येथे नर्सिंग विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण करून रुग्णांना फळ वाटप केले. पथनाट्यामार्फत रुग्णांचे प्रबोधन असे अनेक उपक्रम राबविले. या स्तुत्य उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉक्टर अपर्णा संखे, हेमलता गजबे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. आणि हा कार्यक्रम राबवण्यासाठी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर पेडणेकर, डॉक्टर खाडे, डॉक्टर प्रतिभा कोकाटे, तुषार सोनवणे व इतर रुग्णालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.