‘लग्नाला यायचं हं!’ अवघ्या साडे तीन सेंटीमीटर रूंदीच्या पट्टीवर लग्नपत्रिका अन् दिलं आमंत्रण

118

सध्या सोशल मीडियाचा युगात जगत असताना बऱ्याच भन्नाट गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये लोकांची क्रिएटिव्हिटी इतकी असते की त्यांचे कौतुक केल्यावाचून आपण राहत नाही. सध्या अशीच एक क्रिएटिव्हिटी वापरून तयार केलेली लग्नपत्रिका सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. तुम्ही आतापर्यंत बरेच महागड्या आणि हिरेजडित लग्नपत्रिका पाहिले असतील. पण अशी लग्नपत्रिका तुम्ही याआधी कधीच पहिली नसणार हे नक्की…

अवघ्या साडे तीन सेंटीमीटरच्या पट्टीवर लग्नपत्रिका

एका ट्विटर युजरने ही अनोखी लग्नपत्रिका त्याच्या अकाऊंटवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये लग्नाचे मेनूकार्ड असून या मेनू कार्डची झलक समोर येताच जोरदार चर्चा होताना दिसतेय. चर्चा होण्याचं कारणही अगदी विशेष आहे. कारण ही लग्नपत्रिका साडे तीन सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर उंचीच्या लाकडी पट्टीवर तयार करण्यात आली आहे.

(हेही वाचा -पोलिसांच्या बदल्या झाल्याच नाही, ‘ती’ यादी खोडसाळपणाने व्हायरल)

siliguri

सोशल मीडियावर लग्नपत्रिका होतेय व्हायरल

साधारणपणे आपण पाहिलेल्या लग्नपत्रिकेत नवरा नवरी चे नाव नातेवाईकांची नावे लग्नाचा मुहूर्त इतकंच दिसतं पण व्हायरल होणाऱ्या लग्न पत्रिकेत तुम्हाला लग्नात चाखायला मिळणाऱ्या स्वादिष्ट पदार्थांची संपूर्ण यादी दिली आहे. या यादीमध्ये फिश कालिया, फ्राईड राईस, मटण मसाला आणि आंब्याची चटणी यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथील सुष्मिता आणि अनिमेश या जोडप्याच्या लग्नाची ही पत्रिका आहे. या जोडप्याचे लग्न 2013 मध्ये झालं होतं. त्यांचं लग्न थाटामाटाने झालं होतं मात्र त्यांची अनोखी लग्नपत्रिका अद्यापही सोशल मीडियावर चांगलाच भाव खाऊन जातेय आणि तितकीच व्हायरल होतेय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.