गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण असताना, शनिवारी सकाळी पश्चिम उपनगरांत पावसाने अचानक हजेरी लावली. कधी उष्ण वातावरण, कधी कडाक्याची थंडी असा वातावरणात बदल होत असतानाच, त्यात आता पाऊस पडल्यामुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास मुंबईकरांना होण्याची शक्यता आहे. अगोदरच व्हायरल इन्फेक्शनची साथ असताना पावसामुळे मुंबईकरांच्या आजारपणात भर पडण्याची शक्यता आहे.
जानेवारीत पाऊस! बदलत्या हवामानामुळे सध्या मुंबईत चक्क जून-जुलै महिन्यासारखे पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासून मुंबईत दादर, अंधेरी, कांदिवलीसह सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. #MumbaiRains @CMOMaharashtra @mnreindia @Hosalikar_KS pic.twitter.com/MVYbtg11EF
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) January 8, 2022
या भागांत पावसाची हजेरी
सध्या कोरोनानेही मुंबईत थैमान घातले आहे. त्यामुळे या सततच्या बदलत्या वातावरणाचा प्रभाव मुंबईकरांच्या आरोग्यावर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. शनिवारी सकाळी कांदिवली आणि बोरिवली परिसरात पावसाने हजेरी लावली. दादरच्या काही भागांतही पावसाचा जोर आढळून आला.
( हेही वाचा :मुंबईत रक्ताचा तुटवडा…आता रक्तदान करूयात! )
मुंबईत झालेल्या या पावसानंतर किमान तापमान एकोणीस अंश सेल्सियसवर नोंदवले गेले. थंडीचा प्रभाव शनिवारी जास्त राहण्याची शक्यता आहे. ज्यांना दमा आहे अशा नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे दमा असणा-या नागरिकांना या अचानक बदललेल्या वातावरणाचा त्रास जास्त होण्याची भीती असते, असे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले आहे.