आधार कार्ड भारतीय नागरिकांचे महत्वाचे ओळखपत्र आहे. अलिकडे शाळेत प्रवेश घेण्यापासून, बॅंकेचे कामकाज, सिम कार्ड खरेदी करताना, पासपोर्ट काढताना अशा सर्व महत्वाच्या कामकाजात आधार कार्ड अनिवार्य असते. यामुळेच आधार कार्डवरील माहिती अचूक व अपडेटेड असणे महत्वाचे असते. आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख, वय, घरचा पत्ता यामध्ये चुका आढळल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. परंतु आता तुम्ही घरबसल्या तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता. लॅपटॉप, कॉम्प्युटरशिवाय तुम्ही स्मार्टफोनच्या माध्यमातून सुद्धा आधार कार्डच्या माहितीमध्ये बदल करू शकता याविषयी आपण जाणून घेऊया…
( हेही वाचा : सिम कार्डची एक बाजू कट केलेली का असते? जाणून घ्या… )
स्मार्टफोनच्या माध्यमातून असे करा तुमचे आधार कार्ड अपडेट
- तुमच्या आधार कार्डवरील नाव, वय, पत्ता, जन्मतारीख यात काही चुका झाल्या असतील तर तुम्ही स्मार्टफोनवरून सुद्धा या चुका दुरूस्त करत तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता. यासाठी सर्वप्रथम यूआडीएआयची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्या.
- Update your Aadhaar हा पर्याय सिलेक्ट करा यानंतर Update your demographics data online वर क्लिक करा. यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाइट ssup.uidai.gov.in वर रिडायरेक्ट व्हाल.
- आता तुम्हाला तुमचा १२ अंकी आधाक क्रमांक समाविष्ट करावा लागेल. हा क्रमांक टाकून लॉग इन करा, कॅप्चा टाका. यानंतर सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करा. तुमच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. याद्वारे तुम्ही तुमची व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करा.
- यानंतर तुमच्या समोर एक नवे पेज ओपन होईल. येथे तुम्हाला तुमचे नाव, वय, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती अपडेट करता येईल.
- सर्व माहिती रितसर भरल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी येईल. व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होऊन तुमचे आधार कार्ड घरबसल्या अपडेट होईल. जन्मतारीख बदलताना तुम्हाला आयडी प्रूफ म्हणून जन्मदाखला द्यावा लागेल.