UPI पेमेंट करताना ‘या’ चुका कराल, तर बॅंक अकाऊंट होऊ शकते रिकामे

131

पंतप्रधान मोदींनी कॅशलेस, डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्या असे आवाहन समस्त देशवासीयांना केले होते. अलिकडे अनेकजण ऑनलाइन व्यवहारांसाठी UPI पेमेंट पद्धतीचा वापर करतात. परंतु अनेकदा ऑनलाइन व्यवहार करताना फसवणुक होण्याची शक्यता असते. सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सुद्धा अलिकडे वाढ झालेली आहे त्यामुळे तुम्ही जर UPI वापरत असाल तर या खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा. यामुळे तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यास मदत होईल.

( हेही वाचा : बीडीडी चाळीत पोलिसांना १५ लाखांत घरे देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा )

UPI पेमेंट करताना या चुका करू नका…

लिंक ओपन करू नका

SMS किंवा ईमेलवर आलेल्या लिंकवर क्लिक केल्यामुळे अनेकदा लोकांची फसवणूक होते. तुमच्या फोनवर येणाऱ्या अशा अज्ञात लिंक ओपन करणे टाळा यामुळे तुमचा फोन हॅक होऊ शकतो. तुम्हाला अशा लिंक्स आल्या असतील तर संबंधित अकाऊंटला त्वरीत ब्लॉक करा. व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या अज्ञात लिंक, लकी ड्रॉ स्पिन अशा लिंक ओपन करणे सुद्धा टाळावे.

मोबाइल स्क्रिन लॉक सुरू ठेवा, UPI पिन वेळोवळी बदला 

व्यवहार करण्याआधी नेहमी UPI आयडी व्हेरिफाय करा, पैसे पाठवण्याआधी UPI आयडी पुन्हा तपासणे आवश्यक असते. जास्त रक्कम पाठवण्याआधी तुम्ही कन्फर्मेशन म्हणून कमीत कमी १ रुपया पाठवू शकता.

फोनमध्ये स्क्रिन लॉन आणि सिक्युरिटी सुरू ठेवा, सायबर गुन्हेगारांपासून रक्षण करण्यासाठी वेळोवेळी UPI पिन आणि अ‍ॅप अपडेट करा. हा पिन चार किंवा सहा अंकांचा असतो.

तुमच्या फोनमध्ये महत्त्वाचे अ‍ॅप्स, इमेल आणि इतर काही खासगी माहिती असल्यास नेहमी तुमचा फोन लॉक ठेवा. UPI अ‍ॅप्स सुरू करण्यापूर्वी एक वेगळे स्क्रिन लॉक सेट करा. यामुळे तुमचा फोन चोरीला गेला तरी तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी असेल तसेच स्वत:चा स्क्रिन पासवर्ड वारंवार बदलण्याचा सल्ला दिला जातो.

फोनवर पासवर्डची माहिती देऊ नका 

UPI पिन कोणासही सांगू नका तसेच पैसे पाठवताना कोणी तुम्हाला तुमचा पिन टाकण्यास सांगत असल्यास सावधगिरी बाळगा. फोन करून UPI पासवर्ड, पिन विचारल्यास याविषयी माहिती देऊ नका.

मेल आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सणासुदीच्या काळात आकर्षक ऑफर्स मिळतात. अशा लिंक्स तुम्हाला कॅशबॅक देतात. या लिंक्सवर कधीच क्लिक करू नये.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.