Google Pay, Phone पे वरुन Transaction फेल झाल्यास एका क्लिकवर पैसे मिळणार परत, UPIची नवी सिस्टम

136

सध्या Digital Payament च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार ऑनलाईन होत आहेत. त्यासाठी गुगल पे, फोन पे यांसारख्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येतो. Unified Payment Interface(UPI) सिस्टमद्वारे हे पेमेंट करण्यात येते. पण काही वेळा UPI ट्रॅन्झॅक्शन फेल झाल्यामुळे बँक अकाऊंटमधील पैसे अडकून राहतात.

यावरच उपाय म्हणून National Payment Corporation of India(NPCI)कडून आता एक नवी सिस्टम तयार करण्यात येणार आहे. यामुळे आता यूपीआय यूजर्सचे पैसे अडकण्याची समस्या एका क्लिकवर सुटणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः Instagram Account हॅक झाले तर असे करा Recover)

अशी आहे नवी सिस्टम

NPCIचे CEO दिलीप आसबे यांनी ही माहिती दिल्याचे हिंदू बिझनेस लाईनच्या अहवालात म्हटले आहे. यूपीआयद्वारे पेमेंट करताना ते फेल झाल्यास यूजर्सच्या तक्रारी सोडवण्यासाठी एक रिअल टाईम पेमेंट डिस्प्यूट रिजॉल्यूशन सिस्टम तयार करण्यात येणार आहे. ही सिस्टम सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू करण्यात येण्याचे सांगण्यात येत आहे. याद्वारे UPI Payment अ‍ॅप्सवर एक नवीन फीचर देण्यात येणार आहे. या फीचरवर क्लिक करुन 80 ते 90 टक्के पेमेंट फेल्यूअर रिअल टाईममध्ये सोडवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः EPFO Interest Rate: PF च्या व्याजदरात 43 वर्षांतील सर्वात मोठी घसरण)

यापुढे पेमेंट फेल हाऊन यूजर्सचे पैसे अडकल्यास यूजर्सना आता बँकेत कॉल करण्याची गरज भासणार नाही. UPI अ‍ॅपद्वारेच या तक्रारी रिअल टाईममध्ये सोडवण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.