UPI ने पैसे ट्रान्सफर करताय? आता पेमेंटवर लागणार चार्ज, RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

119

अलिकडे आपण बरेच व्यवहार ऑनलाईन युपीआयद्वारे (UPI) करतो. UPI ने पेमेंट करणे अगदी सोयीचे समजले जाते परंतु आता भारतीय रिझर्व्ह बॅंक (RBI) यूपीआय आधारित व्यवहारांवर शुल्क लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भविष्यात UPI मधून पैसे ट्रान्सफर करणे तुम्हाला महागात पडू शकते.

( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! थकित देणी गणेशोत्सवाआधी देण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश)

RBI घेतंय लोकांकडून सल्ला

शुल्क आकारणीसाठी RBI ने लोकांकडून अभिप्राय मागवले आहेत. यासाठी RBI कडून ‘डिस्कशन पेपर ऑन चार्जेस इन पेमेंट सिस्टम’ जारी करण्यात आले आहे. RBI ने शुल्क आकारण्याबाबत लोकांकडून सल्लाही मागितला आहे. सध्या डेबिट कार्ड, यूपीआयवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. RBIने ३ ऑक्टोबरपर्यंत याविषयी अभिप्राय आणि सूचना मागवल्या आहेत.

मोठा खर्च कोण उचलणार

मध्यवर्ती बॅंकेच्या वतीने ‘डिस्कशन पेपर ऑन चार्जेस इन पेमेंट सिस्टमच्या’ पेपरमध्ये ऑपरेटर म्हणून RBI ला RTGS मध्ये मोठ्या गुंतवणुकीची आणि ऑपरेटिंग खर्चाची भरपाई करावी लागेल असे म्हटले आहे. यावर RBIच्या म्हणण्यानुसार RTGS हे कमाईचे साधन नाही परंतु भविष्यात UPI ही सुविधा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू रहावी यासाठी UPI वर खर्च केला जाणार आहे.

UPI पेमेंट ट्रान्सफरसाठी रिअल टाइम सुविधा देते. रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, मोफत सेवा दिल्यास महागड्या पायाभूत सुविधांचा आणि अंमलबजावणीचा मोठा खर्च कोण उचलणार असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे युपीआय पेमेंटवर शुल्क आकारण्याचा विचार केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.