कुली ते IAS अधिकारी! वाचा… श्रीनाथची यथोगाथा!

139

असं म्हणतात की, इरादे पक्के हो तो कोई भी शख्स बड़े से बड़े लक्ष्य को हासिल कर सकता है। तुमच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर तुम्ही मात करू शकता. मूळचा केरळचा असलेल्या श्रीनाथचे यश ही केवळ कथा नसून वास्तव आहे, आम्हाला सुविधा नाहीत असं म्हणत, आक्रोश करणाऱ्यांसाठी हा एक संदेश आहे. श्रीनाथ म्हणतो की, त्याच्यासमोर जी  आव्हाने आली, ती आव्हाने त्याने संधी म्हणून पाहिली. परीक्षेच्या तयारीदरम्यान अनेक अडथळे आले, पण त्याला UPSC पास करण्याची भूक होती जी चौथ्या प्रयत्नात  त्याने शमवली.

अडचणींवर मात करून आयएएस

श्रीनाथची आयएएस अधिकारी होईपर्यंतची कहाणी खूप रंजक आहे. आयएएस होण्यापूर्वी तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुली म्हणून काम करायचा. कौटुंबिक खर्च भागवण्याइतपत मिळकत नसल्याने, तो दुहेरी शिफ्टमध्ये काम करू लागला, तरीही अडचणी कायम राहिल्या, पण त्याने मन खचू दिले नाही. त्याला प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे होते, पण त्याच्या अभ्यासासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती.

( हेही वाचा: ‘आई-वडिलांचा घटस्फोट झाला तरी मुलीचं शिक्षण, लग्न वडिलांचीच जबाबदारी’)

संघर्षाच्या प्रवासात स्मार्टफोन आधार ठरला

श्रीनाथ म्हणतो की त्याच्याकडे जास्त फी भरण्याची क्षमता नव्हती, त्याने कशी तरी स्मार्टफोनची व्यवस्था केली आणि तयारी सुरू केली. श्रीनाथची मेहनत फळाला आली आणि त्याने केरळ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. पण त्याचे ध्येय त्याहून मोठे होते. काही काळानंतर श्रीनाथने आयएएसची तयारी सुरू केली आणि चौथ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.