ऑफिसच्या कामात ईमोजीचा वापर करताय? … तर थोडं थांबा!

126

सध्या आपण सगळेच सर्वाधिक व्हर्च्युअली एकमेकांशी कनेक्ट आहोत. कुटुंबातील सदस्य असो, मित्र-मैत्रिणी असो किंवा ऑफिसमधील आपले बॉस किंवा सह कर्मचारी असो आपण या व्यक्तींशी थेट कॉलवर बोलण्यापेक्षा आता त्यांना एक मेसेज करणं हे आपल्याला जास्त सोयिस्कर वाटतं. मात्र तुम्ही असं करत असाल तर थोडं थांबा ऑफिसच्या कामात तुम्ही चॅटिंग करत असताना इमेज, ग्राफिक्स आणि इमोजी वापरत असाल तर ही बातमी आवर्जून वाचा…

ऑफिसच्या कामात ईमोजीचा वापर करताय?

ऑफिस कामकाजातील व्यक्तीशी मेसेजवर संवाद साधत असताना जर कोणी ईमोजी व अन्य ग्राफिक्सचा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात वापर करत असेल तर त्या कर्मचाऱ्याची मतं फारशी गांभीर्याने घेतली जात नाहीत, असे समोर आले आहे. मेसेजमध्ये ईमोजींचा कमी वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले जाते तर जास्त ईमोजी वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले जात नाही, असे एका पाहणीतून आढळून आले आहे.

(हेही वाचा – बेस्टच्या ताफ्यात आणखी ४ हजार इलेक्ट्रिक बसेस येणार! )

इस्रायलमधील संशोधनातून आलं समोर

मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप व टेलिग्रामवर परस्परांना मेसेज पाठविताना ईमोजींचा वापर होतो. मात्र, ऑफिसच्या कामकाजात संभाषणाचे सारे संकेत पाळणे आवश्यक असते, असे मत कॉलेर स्कूल ऑफ मनेजमेंटचे डॉ. शाय डॅन्झिगर यांनी व्यक्त केले. इस्रायलमधील तेल अवीवमधील कॉलेर स्कूल ऑफ मॅनेजमेन्टतर्फे ही पाहणी करण्यात आली आहे. त्याच्या निष्कर्षावर आधारित एक लेख ऑर्गनायझेशनल बिहेवियर ॲन्ड ह्यूमन डिसिजन प्रोसेस या नियतकालिकात प्रसिद्ध झाला. संशोधकांनी या लेखात म्हटले आहे की, जो कर्मचारी आपल्या ई-मेलमध्ये, झूम प्रोफाइलमध्ये छायाचित्रे, ईमोजींचा अधिक वापर करतो, त्याच्या मताला लोक फार महत्त्व देत नाहीत. ही व्यक्ती उच्चाधिकारी नसावी, असे लोकांचे मत होते. यासह या संशोधनातून असे निरीक्षण समोर आले की, कार्यालयीन कामकाजात ईमोजींचा वापर न करणा-या व्यक्ती कामातही उत्तम असतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.