आता व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे!

98

व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक हे विविध अ‍ॅप्स सामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरातील लाखो युजर्स दैनंदिन जीवनात या अ‍ॅपचा वापर करतात. आता व्हॉट्सअ‍ॅपला एक नवे अपडेट येणार आहे. हे नवीन अपडेट युझर्सना चांगलेच महागात पडू शकते. कारण या नव्या अपडेटनुसार व्हॉट्सअ‍ॅपसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युझर्सला मोठा फटका बसणार आहे.

( हेही वाचा : राज्यात लवकरच ७ हजार पदांसाठी पोलीस भरती!)

‘सब्सक्रिप्शन’ फिचर 

वाबेटाइन्फो या कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचरबाबत माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ‘सब्सक्रिप्शन’ या नव्या फिचरसाठी काम करत आहे. ‘सब्सक्रिप्शन’ फिचरसाठी युझर्सला पैसे खर्च करावे लागणार आहेत. जे युझर्स सब्सक्रिप्शन घेतील त्यांना अतिरिक्त व आकर्षक सुविधा व्हॉट्सअ‍ॅपमार्फत दिल्या जातील.

अ‍ॅंड्रॉइड (android), डेस्कटॉप (desktop), आयओएस (IOS) या मॉडेलसाठी व्हॉट्सअ‍ॅप सब्सक्रिप्शनची प्राथमिक चाचणी केली जात आहे. हे फिचर केवळ व्हॉट्सअ‍ॅप बिझनेससाठी आणि ऐच्छिक असेल. युझर्सला अतिरिक्त सुविधा वापरायच्या नसतील तर युझर्स सब्सक्रिप्शन नाकारू शकतात. लवकरच हे व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर लॉंच करण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.