Vada Pav Recipe : जाणून घ्या झटपट घरगुती वडापाव बनवण्याची सोपी पद्धत

हजारो लोकांची रोजीरोटी बनलेला हा पदार्थ अनेकांच्या पोटाची भूक शमवतो. सध्या बारा ते पंधरा रुपयांमध्ये रोडवर मिळणारा वडापाव मोठ्या हॉटेल्स मध्ये शंभर रुपयामध्ये देखील विकला जातो.

217
Vada Pav Recipe : जाणून घ्या झटपट घरगुती वडापाव बनवण्याची सोपी पद्धत

वडापाव (Vada Pav Recipe) हा महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचा आवडता खाद्य पदार्थ आहे. हजारो लोकांची रोजीरोटी बनलेला हा पदार्थ अनेकांच्या पोटाची भूक शमवतो. सध्या बारा ते पंधरा रुपयांमध्ये रोडवर मिळणारा वडापाव मोठ्या हॉटेल्स मध्ये शंभर रुपयामध्ये देखील विकला जातो.मात्र आता तुम्हीसुद्धा घरच्याघरी साध्या – सोप्या पद्धतीचा वापर करून झटपट वडापाव बनवू शकतो. (Vada Pav Recipe)

(हेही वाचा – Mahim Sea Food Plaza : मुंबईकरांनो, आता कशाला जायचे गोवा? माहिम समुद्र किनारी चाखा, चवदार भोजनाचा मेवा !)

झटपट घरगुती वडापाव बनविण्यासाठी लागणारे साहित्य

१. पावलादी,
२. ४ मोठे बटाटे,
३. ४ ते ५ हिरव्या मिरच्या,
४. वडे तळण्यासाठी तेल,
५. एक चमचा आले लसूण पेस्ट,
६. कोथिंबीर, कढीपत्ता, लिंबू ,
७. फोडणीसाठी – २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद ,
८. आवरणासाठी – १ कप चणा पिठ, ३/४ ते १ कप पाणी, १/२ टिस्पून हळद, चवीपुरते मीठ, चिमूटभर खायचा सोडा
९. चवीपुरते मीठ (Vada Pav Recipe)

(हेही वाचा – Bicycle Thief : मुंबईतील सायकलचोर अटकेत; २५ गुन्ह्यांची उकल)

कृती –

१) बटाटे शिजवून थंड झाल्यावर बारीक – मोठे कुस्करून घ्यावे.
२) मध्यम गॅसवर कढई गरम झाल्यावर २ चमचे तेल गरम करावे. फोडणी साठी मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि नंतर आले-लसूण पेस्ट घालावी. व्यवस्थित परतल्यानंतर त्यात कुस्करलेला बटाटा घालून मंद आचेवर परतावे. चवीपुरते मीठ घालावे. सर्व मिश्रण चांगले एकजीव होईल याची काळजी घ्यावी. शेवटी थोडा लिंबूरस घालावा. तयार झाल्यानंतर भाजी थंड होण्यासाठी ठेवावी.
३) भाजीचे छोटे गोळे करावेत आणि ते गोळे हलकेसे चपटे करावेत.(Vada Pav Recipe)
४) आवरणासाठी बेसन पिठ पाण्यात भिजवावे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, सोडा आणि चवीपुरते मिठ घालावे. पिठ अगदी पातळ किंवा अगदी घट्ट भिजवू नये.
५) कढईमध्ये वडा संपूर्ण बुडेल एवढे तेल घ्यावे. तेल व्यवस्थित तापू द्यावे. भिजवलेल्या पिठाचा एक थेंब तेलात टाकावा. जर तो टाकल्या टाकल्या वर आला तर तेल तापले आहे असे समजावे. तेल तापले कि गॅस मध्यम ठेवावा.
६) भिजवलेल्या बेसन पिठात तयार भाजीचा एक गोळा बुडवून तेलात सोडावा. असे तिन चार वडे (किंवा तळताना कढईत सुटसुटीत मावतील एवढे) हलके लालसर होई पर्यंत तळावेत. (Vada Pav Recipe)
७) पाव मधोमध उभा कापून त्यामध्ये वडा ठेवून खाण्यास द्यावा

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.