वैजयंती माळेचा (Vaijanti Mala) उल्लेख प्राचीन शास्त्रात आढळतो. ही माळ वैजयंतीच्या (Vaijanti Mala) बियापासून बनवली जाते. वैजयंती माळ म्हणजे विजय किंवा जिंकवणारी माळ. वैजयंतीच्या (Vaijanti Mala) झाडावर खूपच सुंदर फुल उमलतात. हे फुल खूप सुंदर आणि सुवासिक असतात. वैजयंतीचे फुल प्रभू श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीला फार आवडतात. श्रीकृष्णाला ही माळ फार प्रिय आहे. प्रभू श्रीकृष्ण आपल्या गळ्यात ही माळ नेहमीच घालत असतं. (Vaijanti Mala)
अशी आहे कहाणी
असे म्हणतात की, जेव्हा भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा राधा राणी आणि त्यांच्या मैत्रिणींसह रासलीला खेळली होती त्यावेळी राधाने त्यांना वैजयंतीची माळ (Vaijanti Mala) घातली होती. वैजयंती एका प्रकारचा फुलांची वनस्पती आहे, ज्यामध्ये लाल आणि पिवळे रंगाचे फुल येतात. या फुलांचे कडक दाणे कधीही तुटत नाही, सडत नाही नेहमीच चकचकीत असतात. ह्याचा अर्थ असा आहे की, जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत असेच राहा. दुसरे असे की या माळेतील जे बियाणं आहे, ते बियाणं स्वतःला जमिनीशी जोडून वाढतो. याचा अर्थ असे आहे की आपण कितीही यशस्वी झाला तरी नेहमी जमिनीशी जुळलेले राहा. (Vaijanti Mala)
काही विद्वान सांगतात की, या वैजयंतीच्या माळेत (Vaijanti Mala) पाच प्रकारांचे मणी गुंफले असतात. जे पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. या मणींचे नाव इन्द्रनीलमणि (पृथ्वी), मोती (जल), पद्मरागमणि (अग्नि), पुष्पराग (वायुतत्त्व) वज्रमणि म्हणजे हीरा (आकाश) आहेत. ही माळ घातल्याने मान सन्मानामध्ये वाढ होते. मानसिक शांती मिळते ज्यामुळे व्यक्ती आपल्या कार्याच्या क्षेत्रात मन लावून काम करते. या वैजयंती माळेने (Vaijanti Mala) ‘ऊं नमः भगवते वासुदेवाय’ मंत्राचा नियमाने जप केल्याने वैवाहिक जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात. जप केल्यावर केळ्याच्या झाडाची पूजा करावी. (Vaijanti Mala)
वैजयंतीची माळ कशी घालावी ?
शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी पूजा करणे आणि शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करणे. स्नान वगैरे करून ओम वैष्णवाय नमः ची जपमाळ जप करणे. जर तुमच्याकडे गुरु असेल तर त्यांच्या मंत्राचा जप करा आणि जर तुमच्याकडे गुरु नसेल तर ओम नमो: भगवते वासुदेवायाचा जप किमान १०८ वेळा करा. तसेच गरिबांना काहीतरी दान करा. शक्य असल्यास गरिबांमध्ये मिठाईचे वाटप करा. यानंतर वैजयंती माळ धारण घालावी. (Vaijanti Mala)
वैजयंतीची माळ (Vaijanti Mala) कोणत्याही सोमवार आणि शुक्रवारी धारण करू शकता. धारण करण्यापूर्वी गंगाजल किंवा शुध्द पाण्याने धुवून घ्यावी. (Vaijanti Mala)
हे पहा –
Join Our WhatsApp Community