valentine’s day quotes : व्हेलेंटाईन डे येतोय; तुमची तयारी झालीय का? valentine’s day साठी सर्वोत्तम quotes वाचा इथे!

23
valentine's day quotes : व्हेलेंटाईन डे येतोय; तुमची तयारी झालीय का? valentine's day साठी सर्वोत्तम quotes वाचा इथे!

१४ फेब्रुवारी हा प्रेमीयुगुलांसाठी खास दिवस! या दिवशी दोन प्रेम करणारी मने एकत्र येतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. पूर्वी अनेक लोक या दिवसाला विरोध करायचे. मात्र कालांतराने भारतातही या दिवसाचा स्वीकार केला असून अनेक तरुण आपले प्रेम व्यक्त करतात. मात्र या दिवशी हुल्लडबाजी करु नये, एवढे मात्र खरे.

आज आम्ही या लेखात तुम्हाला तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी काही खास संदेश (valentine’s day quotes) देणार आहोत. चला तर पाहुयात valentine’s day quotes :-

(हेही वाचा – Ind vs Eng, 1st ODI : हर्षित, यशस्वीचं एकदिवसीय पदार्पण, दोघांना भारतीय कॅप मिळाल्या तो क्षण)

१.
तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जोपर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावरच असेल…
Happy Valentine’s Day!

२.
“तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटतं
वेळेने पण थोड थांबावं.
आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नात..
असचं उमलत राहवं….
‘हॅप्पी व्हेलेंटाईन डे!!

३.
माझ्या जीवनात तू आहेस
हेच खूप आहे माझ्यासाठी
माझे आयुष्यभराचे प्रेम
जपून ठेवीन मी फक्त तुझ्यासाठी..

४.
या Valentines Day ला मला गिफ्ट मध्ये,
तू आणि तुझा वेळ हवाय,
जो फक्त माझ्या साठी असेल…
Happy Valentine’s Day!

५.
चंद्राचा तो शीतल गारवा,
मनातील तो प्रेमाचा पारवा..
ह्या नशिल्या संध्याकाळी,
हात तुझा हाती हवा.
Happy Valentine’s Day!

(हेही वाचा – Fire in Mahakumbh: महाकुंभमेळा परिसरात पुन्हा लागली आग ; ५ मिनटांत मिळवले नियंत्रण)

६.
केसांची बट मागे सारताना,
मनात मोहोर फुलला होता
हास्य तुझे पाहताक्षणी
तो चंद्रसुद्धा खुलला होता.

७.
ना Rose पाहिजे, ना Chocholate पाहिजे,
ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे,
फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे…
Happy Valentine’s Day!

८.
“ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
सांग ना मला तुझ्या मनातील बात”
Happy Valentine’s Day

९.
दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे कळेना..
आजच्या या प्रेमदिवशी, समज माझ्या वेदना…

१०.
बोलणं जरी कमी झालं
तरी प्रेम आपलं तसचं आहे.
काळजी घेत जा तू स्वतःची
कारण माझा जीव ‘तुझ्यात आहे
Happy Valentine’s Day

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.