पर्यटन दिनानिमित्त MTDC ने आयोजित केले विविध कार्यक्रम

पर्यटन संचालनालयाचे कोकण भवन प्रादेशिक कार्यालय आणि डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज (नेरूळ, नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त येत्या मंगळवारी म्हणजेच २७ सप्टेंबरला सकाळी १०.०० ते १२.०० या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

( हेही वाचा : Sunday Megablock : रविवारी बाहेर पडताय? ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक! )

विविध स्पर्धांचे आयोजन 

कोरोनाने पर्यटन उद्योगात परिवर्तन घडवून आणण्याची महत्त्वाची गरज अधोरेखित केली आहे. पर्यटनाचा पुनर्विचार या वर्षाच्या थीमनुसार पर्यटन संचालनालय आणि डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने “पर्यटन 2022-टुरिझम फेस्ट” अंतर्गत ट्रॅव्हल फोटोग्राफी स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, पर्यटनाचा पुनर्विचार या विषयावर वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धांमध्ये नवी मुंबईतील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज, अमिटी युनिव्हर्सिटी, ॲपटेक एव्हिएशन ॲकॅडमी, आयसीई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, एस. पी. मोरे कॉलेज या महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भाग घेणार आहेत. स्पर्धेत पहिले तीन क्रमांक पटकवणाऱ्या विद्यार्थ्यांना कोकण विभागीय आयुक्तांच्या हस्ते मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भागा घ्यावा आणि जागतिक पर्यटन दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालक हनुमंत कृ. हेडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here