वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या रियाची राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णकामगिरी!

बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील खेडाळू रिया सुतार ही, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात कोच राजन जोथाडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. अनेक वर्षांचे प्रशिक्षण, मेहनत व जिद्दीच्या जोरावर रिया हीने ज्युनियर गर्ल्स महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.

सुवर्णपदकाला गवसणी

सांगली येथे १७ व्या ज्युनियर गर्ल्स महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशीपचे आयोजन २६ ते २९ डिसेंबर २०२१ या कालावधीत करण्यात आले होते. यामध्ये मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या मृणाल गणवीर आणि रिया सुतार यांनी केले होते. या मध्ये रिया सुतार हिने ७५ ते ८० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या प्रतिनिधीचा तिने पराभव केला.

वीर सावरकर बॉक्सिंग क्लब येथे मुलांना बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिले जाते. याठिकाणी रिया हीने राजन जोथाडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत हा विजय संपादित केला.

(हेही वाचा : #BalikaDivas2022 राज्य शासनाचा मुलींसाठी अभिनव उपक्रम! )

फेन्सिंगमध्येही विजय

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सावरकर फेन्सिंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या वैभवी इंगळे हिने हरियाणातील सोनीपत येथे २९ व्या कनिष्ठ राष्ट्रीय फेन्सिंग (फॉइल गर्ल्स टीम इव्हेंट) स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here