
मुंबई उपनगर बोरिवली पश्चिमेला असलेलं वीर सावरकर उद्यान हे एक मोठं सुव्यवस्थित हिरवंगार उद्यान आहे. या उद्यानामध्ये वेगवेगळ्या सुविधा आहेत. त्यामध्ये खेळाचं मैदान, स्केटिंग रिंक, बोटिंगसाठी तलाव आणि जॉगिंग ट्रॅक यांचा समावेश आहे. या उद्यानाचं नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. (veer savarkar garden borivali west)
वीर सावरकर उद्यान हे मोठ्या वडाच्या आणि पिंपळाच्या झाडांनी वेढलेलं आहे. या उद्यानात सर्वांसाठी चालण्यासाठी ट्रॅक, खेळाचे मैदान आणि ग्रंथालय अशा सुविधा आहेत. याव्यतिरिक्त या उद्यानात १ ते १० वयोगटातल्या मुलांसाठी एक खेळाचं मैदान आहे. त्या मैदानात मुलांसाठी स्केटिंग रिंक, राईड्स आणि वाळूवर खेळण्याची सुविधा आहे. याव्यतिरिक्त इथे नाना-नानी पार्क, योगा (मेडिटेशन) इत्यादी सुविधा देखील आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचं प्रवेश शुल्क फक्त २ रुपये एवढं आहे. (veer savarkar garden borivali west)
(हेही वाचा – Karla caves : कार्ला इथल्या लेण्या सांगतात गौतम बुद्ध आणि सनातन संस्कृतीचा वारसा!)
स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाविषयी खाली तपशीलवार माहिती दिली आहे…
पत्ता : प्लॉट क्रमांक १२८, बोरिवली पश्चिम, मुंबई – ४०००९१.
लँडमार्क : वीर सावरकर गार्डन, गणपती अपार्टमेंट समोर, एल टी रोड जवळ, टीपीएस रोड क्रमांक ३.
उद्यानाचं क्षेत्रफळ : हे उद्यान सात एकरांपेक्षा जास्त जागेवर विस्तारलेलं आहे. त्यामुळे ते शहरातल्या सर्वांत मोठ्या खुल्या जागांपैकी एक बनलं आहे. (veer savarkar garden borivali west)
(हेही वाचा – Rajmachi Fort : राजमाची ट्रेक करताना येतो अद्भुत अनुभव; विविध वनस्पती आणि जंगली प्राण्यांशी होते मैत्री!)
उद्यानात असलेल्या सुविधा :
- खेळाचं मैदान
- स्केटिंग रिंक
- बोटिंग क्षेत्र
- जॉगिंग ट्रॅक (१.५ किमी)
- अॅम्फीथिएटर
- नाना-नानी पार्क
- मुलांसाठी प्ले झोन
- लायब्ररी
- गॅझेबोस
- वातानुकूलित खोल्या
- योगा वर्ग
- व्हीलचेअरकरिता आत येण्याची आणि बाहेर पडण्याची सोय
- व्हीलचेअरने जाता येईल अशी कार पार्किंग
- मुलांसाठी राईड्स आणि स्लाईड्स
- घरगुती कार्यक्रमांसाठी जागा
- स्टेज असलेले दोन गॅझेबो
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा पुतळा असलेलं मोठं तलाव
- सावरकरांच्या जीवनाबद्दल पोस्टर्स असलेला मध्यवर्ती गॅझेबो (veer savarkar garden borivali west)
(हेही वाचा – Railway मध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने ५६ लाखांची फसवणूक; ३ जणांविरुद्ध एफआयआर दाखल)
प्रवेश शुल्क : प्रति व्यक्ती २ रुपये.
वेळ : सकाळी ५:३० ते रात्री १०:३०.
तर, या उद्यानाला आजच भेट द्या आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा. (veer savarkar garden borivali west)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community