Veer Savarkar International Airport : अंदमानच्या पर्यटनाला नवीन आयाम देणारं पोर्ट ब्लेअरचं वीर सावरकर आंतरारष्ट्रीय विमानतळ

Veer Savarkar International Airport : अलीकडेच या विमानतळाचं ७०७ कोटी रुपये खर्चून नुतनीकरण करण्यात आलं आहे.

48
Veer Savarkar International Airport : अंदमानच्या पर्यटनाला नवीन आयाम देणारं पोर्ट ब्लेअरचं वीर सावरकर आंतरारष्ट्रीय विमानतळ
  • ऋजुता लुकतुके

अंदमान व निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्टब्लेअरमध्ये दक्षिणेला असलेलं वीर सावरकर हे विमानतळ पूर्ण क्षमतेनं जुलै २०२३ मध्ये सुरू झालं आहे आणि त्यामुळे या बेटांवरील पर्यटनाला एक नवीन आयाम प्राप्त झाला आहे. यापूर्वी विमानतळाचं नाव पोर्टब्लेअर विमानतळ असंच होतं. पण, २००२ मध्ये त्याचं नाव बदलून वीर सावरकर विमानतळ असं करण्यात आलं आहे. स्वातंत्र्य लढ्यात वीर सावरकर यांनी तब्बल ११ वर्षं इथल्या तुरुंगात काढली होती. त्यावरून या विमानतळाला सावरकरांचं नाव देण्यात आलं. (Veer Savarkar International Airport)

(हेही वाचा – भाजपाच्या विजयावर मुख्यमंत्री Yogi Adityanath यांचे विधान; म्हणाले, “दिल्लीत खोटेपणा आणि लुटीच्या राजकारणाला पूर्णविराम”)

२००५ मध्ये सुरुवातीला हे विमानतळ लोकांसाठी खुलं झालं. पण, तेव्हा इथली प्रवासी क्षमता दिवसाला ४०० पर्यटकांना हाताळण्याची होती. पण, २०१९ मध्ये विमानतळाच्या नुतनीकरणाला सुरूवात झाली आणि नवीन टर्मिनलवर आता दिवसाला १२०० प्रवासी हाताळता येतात. शिवाय एअरबस, बोइंग ७३७ अशी अवजड विमानंही इथं उतरवता येतात. नवीन विमानतळ टर्मिनलवर २३ चेक इन काऊंटर आहेत. आगमन व निर्गमन तसंच वेटिंग धरून तीन वेगळे मजले आहेत. आणि तीन एअरोब्रिज असलेली गेट आहेत. (Veer Savarkar International Airport)

(हेही वाचा – Dabur India Share Price : ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या कंपन्यांमध्ये आहे गोंधळाचं वातावरण; डाबरला गुंतवणूकदारांची पसंती)

अंदमान बेटांना जसं ऐतिहासिक महत्त्व आहे तसंच इथले समुद्र किनारे आणि सागरी खेळ यामुळे पर्यटनासाठीही लोकांचा इथं ओढा वाढत आहे. नवीन विमानतळामुळे देश विदेशातील पर्यटकांना कमीत कमी वेळेत पोर्ट ब्लेअरला पोहोचता येणार आहे. विमानतळाची मुख्य इमारत ही शंखाच्या आकाराची आहे. सध्या चेन्नई, दिल्ली, विशाखापट्टणम, बंगळुरू, कोलकाता व हैद्राबाद या विमानतळांवरून इथं थेट सेवा सुरू आहेत. तर एअर एशिया कंपनी मलेशिया ते पोर्ट ब्लेअर अशी सेवाही इथून चालवते. सध्या दिवसभरात या विमानतळावर २२ विमानं येतात. नवीन टर्मिनल सुरू झाल्यापासून इथली प्रवासी संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी वाढली आहे. २०२४ मध्ये या विमानतळावरून १४,५३,८१० प्रवाशांनी ये-जा केली. २०२४ मध्ये इथून परदेशी सेवा सुरू झाली. एअर एशिया ही विमान कंपनी इथून पोर्ट ब्लेअर ते मलेशिया अशी ही सेवा आठवड्यातून तीन दिवस चालते. आतापर्यंत या सेवेला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. (Veer Savarkar International Airport)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.