Vegies Is Rainy Season : पावसाळ्यात आहारात ‘या’ रानभाज्यांचा समावेश नक्की करा

208
Vegies Is Rainy Season : पावसाळ्यात आहारात ‘या’ रानभाज्यांचा समावेश नक्की करा
Vegies Is Rainy Season : पावसाळ्यात आहारात ‘या’ रानभाज्यांचा समावेश नक्की करा

सर्वाना हवाहवासा असलेला पावसाळा हा ऋतू चालू आहे. पावसाळ्यात आहारात वेगवेगळ्या प्रकारे बदल केले जातात. त्यात बरेचदा घरच्या गृहिणींना कोणत्या भाज्या बनवाव्यात, असा प्रश्न नेहमी पडतो. याच ऋतूत रानभाज्यांना जास्त प्राधान्य दिले जाते. पावसाळ्यात आहारात या रानभाज्यांचा समावेश करा. (Vegies Is Rainy Season)

(हेही वाचा – HS Prannoy Ranking : एच एस प्रणॉय कारकीर्दीतील सर्वोत्तम ६व्या क्रमांकावर )

१. कंठोळी भाजी

ही एक फळभाजी असून ती पावसाळ्यात कमीतकमी पंधरा दिवसात पूर्ण उगवते. ही भाजी कारल्यासारखी दिसते आणि चवीला कडूसुद्धा असते. कारल्याची भाजी करतात तशीच या फळाची भाजी केली जाते. ही भाजी आहारात असल्यास अनेक फायदे होतात. कांठोळीची वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम घाट व पश्‍चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात. कर्टोली ला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात.

२. कुलूची भाजी

पावसाळ्याच्या अगदी पहिल्या सरीनंतर कुलुची भाजी रानोमाळ दिसू लागते. अगदी काही दिवसातच ही भाजी तयार होत असल्याने बाजारात सर्वात आधी याच भाजीचं आगमन होतं.

३. कुरडूची भाजी

हे एक प्रकारचं तण असतं. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रानोमाळ कुरडू जातीची पालेभाजी दिसू लागते. कुरडू पालेभाजीच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. (Vegies Is Rainy Season)

४. टाकळ्याची भाजी

ही भाजी दिसायला मेथीच्या भाजी सारखीच दिसते. रानोमाळी टाकळ्याची भाजी गवताबरोबर पसरलेली आपण पाहू शकतो. ठाणे मुंबईच्या बाजारात मेथीच्या जुडी सारखी ही भाजी घेता येते.

५. दिंडा भाजी

दिंडा भाजी पावसाळा संपला की मृत अवस्थेत जाते आणि पावसाळ्याच्या पहिल्या सरीबरोबर त्याला नवे कोंब फुटू लागतात. पूर्ण वाढ होण्याआधीच तिची कोंब खुडले जातात. दिंडाची भाजी खास प्रसिद्ध आहे.

वर्षभर मेथी, शेपू, पालक, लाल माठ यांसारख्या नेहमीच्या पालेभाज्या ऐवजी तुम्ही पावसाळ्यात मात्र रानभाज्यांची चव चाखू शकता. वसई, विरार, पालघर, मुरबाड, पनवेल, कल्याण, कर्जत, नेरळ, उरण आणि अलिबाग या भागांमधील बाजारात या भाज्या सहज उपलब्ध होतात. (Vegies Is Rainy Season)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.