व्हॉट्सअ‍ॅप वरील हे नवं शानदार फिचर तुम्हाला माहिती आहे का?

119

व्हॉट्सअ‍ॅपने आता एक नवं शानदार फिचर यूजर्सच्या भेटीला आणले आहे. व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर व्हू वन्स फिचरवर काम करत होते. याआधी बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध असलेले हे फिचर आता सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे. व्हू वन्स फीचरमध्ये पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ एकदा बघितल्यावर त्वरित डिलीट होतील. हे फिचर इन्स्टाग्राममध्ये आधीपासून देण्यात आले आहे.

व्हू वन्स फिचर म्हणजे काय?  

व्हू वन्स  फिचर मिळाल्यावर युजर्सना फोटो किंवा व्हिडिओ पाठवताना मेसेज प्रीव्यू सोबत छोटं व्हू वन्स बटण दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर हे फिचर अ‍ॅक्टिव्हेट होईल आणि पाठवलेला फोटो किंवा व्हिडिओ फक्त रिसिव्हरला एकदाच बघता येईल. मेसेज पाठवणाऱ्या युजरला मेसेज डिलिवर, सीन आणि ओपन्ड असे मेसेजचे स्टेटस दिसतील. म्हणजे रिसिव्हरने हा मेसेज उघडून बघितला कि नाही हे देखील समजेल. रिसिव्हर या मेसेजचा स्क्रिनशॉट घेऊ शकतील, कारण व्हाॅट्सअ‍ॅपवर अजूनतरी स्क्रीनशॉट डिटेक्शन फिचर देण्यात आले नाही.

कोणालाही पाठवू शकता मेसेज

नवीन व्हू वन्स फीचर ग्रुपमध्ये देखील वापरता येईल. ग्रुपमधील सर्व मेम्बर्स फक्त एकदाच या फिचरच्या माध्यमातून पाठवलेला मेसेज बघू शकतील. या फिचरचा वापर करून मेसेज पाठवण्यासाठी व्हू वन्स फिचर तुमच्या व्हाॅट्सअ‍ॅपवर असले पाहिजे, परंतु व्हू वन्स  मेसेजेस रिसिव्ह करण्यासाठी या फिचरची आवश्यकता असणार नाही.

 ( हेही वाचा :अरे व्वा! चक्क लोकलमध्ये मिळणार वायफाय )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.