सरपटणाऱ्या प्राण्यांवर संशोधन करणाऱ्या ‘या’ संशोधिकेचे नाव मिळाले पालीच्या नव्या प्रजातीला!

159

कर्नाटक राज्यात आढळून आलेल्या पालींच्या तीन प्रजातींचा शोध ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशन या वन्यजीव संशोधनावर काम करणा-या पर्यावरणप्रेमी संस्थेने लावला आहे. त्यापैकी एका पालीला भारतातील कासवांबाबतची माहिती समोर आणणा-या सरीसृप शास्त्रज्ञ (हर्पेटोलॉजिस्ट) विजया जगन्नाथन यांचे नाव देण्यात आले आहे. आपल्या कार्यकाळात कासवांच्या संशोधनात मोलाचे काम करुनही या सरीसृप शास्त्रज्ञ जगाला फारशा परिचित नाही. त्यांच्या योगदानासाठी तीन पालींपैकी एका पालीला ठाकरे फाऊंडेशनच्या वन्यजीव संशोधकांनी ‘निमास्पिस विजयायी’ असे नाव दिले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच जर्मनीत प्रकाशित होणा-या व्हर्टब्रेट झुलोजी या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून या तीन नव्या पालीच्या प्रजातींची माहिती प्रकाशित करण्यात आली.

( हेही वाचा : कोकण किनाऱ्यावर झाले दुर्मिळ कासवांच्या पिल्लांचे दर्शन! )

ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशन फाऊंडेशनचे वन्यजीव संशोधक अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अग्रवाल यांनी या तीन पालींच्या प्रजाती शोधून काढल्या. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्यावतीने २०१८ सालापासून भारतात दिसून येणा-या पालींच्या प्रजातींचा अभ्यास करण्यात येत आहे. सुरुवातीपासून ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनने राज्यातील ताम्हिणी घाट, कोयना अभयारण्य, ताम्हिणी घाट अभयारण्य, कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्य, अंबोली घाट, कोल्हापूरातील आंबा घाट येथील पालींच्या प्रजातींचे संशोधन केले आहे.

पालींच्या संशोधनाबाबत

भारतभरात पालींबाबत फारसे संशोधन झालेले नाही. त्यात गोल बुबुळाच्या पालींपैकी आतापर्यंत ६८ प्रजातींचे संशोधन झाले आहे. गोल बुबुळाच्या पालीच्या प्रजाती आतापर्यंत पश्चिम घाट, पूर्व घाट, अंदमान-निकोबार बेट आणि पूर्व भारतातील आसाममध्ये सापडल्या आहेत. पालींबाबत तामिळनाडू, कर्नाटक आणि गोवा राज्यातही संशोधन झाले आहे. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनने पालींबाबत २०१९ पासून कर्नाटक राज्यांत संशोधनाला सुरुवात केली. या संशोधनातून गोल बबुळाच्या पालीच्या तीन प्रजातींचा शोध लागला.

भारतीय जैवविविधतेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या सरपटणाऱ्या पालींबाबत संशोधनात अजूनही बराचसा वाव आहे, हेच कर्नाटक राज्यातील गोल बुबुळाच्या पालींच्या प्रजातींमध्ये नव्या तीन प्रजातींमधून दिसून आले. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे वन्यजीव संशोधक अक्षय खांडेकर यांनी सांगितले.

पहिली प्रजाती – निमास्पिस टायग्रीस

नव्याने शोधलेल्या तीन पालींपैकी ‘निमास्पिस टायग्रीस’ ही प्रजाती ‘मैसुरेंसिस’ या गटातील असून ती कर्नाटक राज्यातील चिकबल्लापुर जिल्ह्यातील कैवारा या भागांत तीन वर्षांपूर्वी संशोधकांना आढळली. या प्रजातींच्या नरांमध्ये वाघासारखे पट्टेदार रचना दिसून येते. म्हणून या पालीला ‘निमास्पिस टायग्रीस’ असे संबोधले जाते. ही प्रजाती या ग्रॅनाईटच्या खडकावर समुद्रसपाटीपासून साधारण ९१० मीटर उंचीवर आढळून आली.

4

दुसरी प्रजाती – निमास्पिस सक्लेशपूरेनसिस

कर्नाटकातील हस्सन या जिल्ह्यातील सक्लेशपुर या गावांत तीन वर्षांपूर्वी आढळली. गावाचेच नाव ध्यानात घेत ‘गोवाएनसीस’ या गटातील ‘निमास्पिस सक्लेशपूरेनसिस असे ठेवले गेले. ही प्रजाती मिश्र सदाहरित प्रकारच्या जंगलात नदीच्या कडेने, झाडांच्या खोडांवर आणि घरांच्या भिंतीवर समुद्रसपाटीपासून साधारणतः ८५० मीटर उंचीवर आढळून आली.

3

तिसरी प्रजाती

तिसरी प्रजाती कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या शेवटाला गोवाएनसीस गटातीलच एक पाल कॉफीच्या मळ्यात संशोकलांना आढळली. कॉफीच्या लळ्यातील वेढलेल्या घरांत दिसलेल्या या पालीला कासवांवर संशोधन करणा-या भारतीय सरीसृप महिला संशोधिका दिवंगत जे. विजया यांचे नाव दिले गेले.

2

जाणून घ्या पहिल्या भारतीय सरीसृप दिवंगत विजया जगन्नाथन यांच्याबाबत…

भारताच्या पहिल्या सरीसृप संशोधिका विजया जगन्नाथन यांनी कासव या उभयचर प्राण्यावर प्रामुख्याने संशोधन केले आहे. त्यांना कासवकन्या असे संबोधले जाते. विजया जगन्नाथन यांचा जन्म १९५९ साली झाला. १९८७ साली त्या निधन पावल्या. त्यांना सर्वजन प्रेमाने विजी अशी हाक मारायचे. चेन्नईत एथिराज महाविद्यालयात झुओलॉजीच्या पहिल्या वर्षात शिकणा-या विजीने मद्रास स्नेक पार्कमध्ये स्वयंसेवक म्हणून काम सुरु केले. त्यावेळी मद्रास स्नेक पार्कमध्येच स्वयंसेवकाचे काम करणा-या शेखर दत्तात्री यासोबत विजया जगन्नाथन यांनी हळूहळू सरटपणा-या प्राण्यांचा अधिवास असणा-या स्थळांना भेट देण्यास सुरुवात केली. विजया जगन्नाथन यांच्या कार्याची पहिली दखल १९८० साली हमद्रयाद या जर्नलने घेतली गेली. त्यानंतर मद्रान स्नेक पार्कच्या पुस्तकातही त्यांचा उल्लेख झाला. यात विजया जगन्नाथन यांनी मगरींबाबत माहिती लिहिली होती. त्यातूनही पार्कमधील वेगवेगळ्या संशोधनसंबंधित कामातून विजय जगन्नाथन यांनी आपल्यातील संशोधिकेला वाव दिला. त्यांचा पहिले सर्व्हेक्षण पश्चिम बंगाल येथील गोड्या पाण्यातील कासवांबाबत ठरले. त्यांनी उघडकीस आणलेल्या कासवांच्या कत्तलीतील काळ्या बाजारांच्या विक्रीची दखल माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेत कारवाईचा आदेश दिला होता.

1

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.