वीर सावरकर यांच्याविषयी विक्रम संपथ लिखित पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण!

ज्येष्ठ इतिहास अभ्यासक विक्रम संपथ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन २८ मे रोजी वीर सावरकर यांच्या जयंती दिनी प्रकाशित होणार आहे. 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी घेतलेले कठोर परिश्रम आणि स्वातंत्र्यानंतर समाजप्रबोधनासाठी दिलेले अमूल्य योगदान, असा संपूर्ण इतिहास जेष्ठ इतिहास अभ्यासक विक्रम संपथ यांनी दोन खंडांमध्ये लिहिला आहे. त्यांच्या पहिल्या आवृत्तीला उदंड प्रतिसाद लाभला असून दुसरी आवृत्ती २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी प्रकाशित होणार आहे. या दुसऱ्या खंडाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन नुकतेच झाले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्याविषयी महाराष्ट्र वगळता भारतात अन्य राज्यांमध्ये कुणालाही अधिक माहिती नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक गैरसमज पसरले आहेत. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खरी, वस्तुनिष्ठ माहिती सर्वांपर्यंत पोहचावी, या उद्देशाने मी ही दोन पुस्तके लिहिली आहेत. मी इतिहास अभ्यासक असल्याने इतिहासकालीन दस्तऐवजांच्या आधारे ही पुस्तके लिहिली आहेत. त्यातून वाचकांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वस्तुनिष्ठ माहिती होईल, अशी अपेक्षा आहे.
– विक्रम संपथ, जेष्ठ इतिहास अभ्यासक.

दस्तऐवजांच्या आधारे लिहिला इतिहास!    

जेष्ठ इतिहास अभ्यासक विक्रम संपथ यांनी ‘सावरकर : इकोस फ्रॉम दी फोरगटन पास्ट’ या नावाने पहिली आवृत्ती लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वातंत्र्यपूर्व काळातील कार्याचा आढावा घेतला आहे. त्यांचे बालपण, शिक्षण, स्वातंत्र्य चळवळ, अंदमानपर्व असा सर्व जीवनपट यामध्ये सामावलेला आहे. या पहिल्या आवृत्तीला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आता विक्रम संपथ यांनी दुसरी आवृत्ती लिहिली आहे. ‘सावरकर : ए काँटेस्टेड लेगेसी’ या नावाने हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. १९२४ सालानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा रत्नागिरी येथील स्थानबद्धतेचा कालावधी, त्यावेळी त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन ते जाती निर्मूलन’ असे केलेले समाजप्रबोधनाचे कार्य, क्रांतीकारकांना दिलेले प्रोत्साहन, १९४६ सालानंतर हिंदू महासभा सक्रिय झाली, काँग्रेसला टक्कर देण्याची क्षमता कशी निर्माण झाली, देशाची फाळणी, गांधी वध, त्याचा खटला, त्यातून वीर सावरकर यांची झालेली निर्दोष सुटका, कपूर कमिशनचा अहवाल आणि आत्मार्पण असा सर्व कालखंड यात सामावलेला आहे. हा संपूर्ण इतिहास हा भारत आणि इंग्लंड येथील मिळालेल्या दस्तऐवजांच्या आधारे लिहिला आहे.

(हेही वाचा : मुख्यमंत्री साहेब, संजय राऊतांना आवरा, अन्यथा…! काँग्रेस नेत्यांचा इशारा! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here