जगण्यासाठी अशीही धडपड, ७० वर्षीय आजी-आजोबांचा व्हिडीओ व्हायरल!

397

युट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप या समाजमाध्यमांवर दररोज विविध व्हिडिओ व्हायरल होतात. अनेक गरजू लोकांना या व्हायरल व्हिडिओमधून फायदा होऊन, त्यांचे जीवन काही अंशी का होईना पूर्वपदावर येण्यास मदत होते. काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील एका वृद्ध जेवण विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला व संबंधित वृद्ध व्यक्तीच्या दुकानावर प्रचंड गर्दी झाली. यातून त्या माणसाच्या अनेक समस्या मार्गी लागल्या. अगदी त्याच प्रमाणे अलिकडे एका ज्येष्ठ जोडप्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. ‘इटोग्राफर्स’ या प्रसिद्ध युट्यूबरने हा व्हिडिओ त्याच्या पेजवरून शेअर करत मदत करण्याचे आवाहन केले आहे.

१० रूपयात तर्री पोहे

कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली, अशा परिस्थितीतून मार्ग काढत नागपूरचे आजी आजोबा केवळ १० रूपयांत तर्री पोहे विकत आहेत. नागपूर येथील कॉन्वेंट शाळेजवळ हे आजी आजोबा रोज सकाळी ६ ते ४ या वेळेत तर्री पोहे विकतात. गेल्या पाड वर्षांपासून हे आजी आजोबा या ठिकाणी पोहे विकतात.

समाजमाध्यमांमुळे अनेकांचे नशिब उजळते. या महत्वाकांक्षी जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अनेक लोक यांच्या मदतीला पुढे आले आहेत.

( हेही वाचा : पालिकेचा परवाना असेल तरच पाळता येणार श्वान, अन्यथा… )

आलू बोंडा केवळ १५ रुपयात

अस्सल नागपुरी तर्री पोह्याव्यतिरिक्त, आलू बोंडा हा अप्रतिम नाश्ता केवळ १५ रूपयात विकतात. आजोबा तर्री पोहे दुकान सांभाळत असताना, आजी स्वयंपाक करतात.  ७० वर्षांचे कष्टकरी दाम्पत्य कोणावरही अवलंबून न राहता आपला उदरनिर्वाह करत आहे. तसेच अगदीच सवलतीच्या दरात अप्रतिम पोहे व आलू बोंड्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.