तब्बल ९ तास विलंबाने आली ट्रेन; त्यानंतर प्रवाशांनी केले असे काही… पहा व्हायरल व्हिडिओ

84

रेल्वे प्रवासाचे तिकीट दर कमी असल्यामुळे बहुतांश लोक फिरायला किंवा गावी जाताना ट्रेनने प्रवास करण्याला प्राधान्य देतात परंतु बऱ्याच वेळा तांत्रिक अडचणींमुळे गाड्या वेळेवर धावत नाहीत. अशावेळी प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पहावी लागते. पर्यटनासाठी निघालेल्या तरुणाईचा गाड्या विलंबाने धावत असल्या की, हिरमोड होता. पण ट्रेन आली की आनंद सुद्धा पाहण्यासारखा असतो असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ट्रेन १-२ नाही तब्बल ९ तासांच्या विलंबानंतर स्टेशनवर पोहोचल्यावर प्रवासी कसे आनंद व्यक्त करतात याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

( हेही वाचा : BCCI घेणार कठोर निर्णय! रोहितला धक्का? टी२० संघाचा नवा कर्णधार ठरणार…)

या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रवाशांनी ट्रेन ९ तासांनी आल्यावर आनंद व्यक्त केला आहे. ट्रेन हॉर्न वाजवत येत असल्याचे पाहून उपस्थित प्रवासी नाचून आनंद साजरा करत आहेत. एक व्यक्ती तर ट्रेनसमोर नतमस्तक होत असल्याचे पहायला मिळत आहे.

दरम्यान या व्हिडिओवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रेल्वेच्या गाड्या अलिकडे रोजचं उशिराने धावत असल्याने याबाबत दखल घेण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. तर काही जणांनी या घटनांची रेल्वेने गंभीरपणे दखल घेत चांगली सुविधा देणे गरजेचे आहे असेही नमूद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.