Vishrambaug Wada : काय आहे विश्रामबाग वाड्याचा इतिहास?

32
Vishrambaug Wada : काय आहे विश्रामबाग वाड्याचा इतिहास?

विश्रामबाग वाडा (Vishrambaug Wada) हा पुणे शहराच्या मध्यभागी थोरले बाजीराव रोड येथे वसलेला एक उत्तम वाडा आहे. १९व्या शतकाच्या सुरुवातीला हा वाडा म्हणजे मराठा साम्राज्यातले शेवटचे पेशवा, पेशवा बाजीराव द्वितीय यांचं निवासस्थान होतं.

हा वाडा २०,००० चौरस फुट एवढ्या जागेवर बांधला गेलेला आहे. सध्या या ठिकाणी तळमजल्यावर पोस्ट ऑफिस, महानगरपालिकेची काही इतर कार्यालये आणि मराठा कलाकृतींचे एक छोटेसं संग्रहालय आहे. हे संग्रहालय प्रख्यात मराठा इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी जतन केलेलं आहे. हा विश्रामबाग वाडा त्याच्या प्रवेशद्वाराच्या उत्कृष्ट रचनेसाठी आणि कोरीवकाम केलेल्या लाकडी बाल्कनीसाठी प्रसिद्ध आहे.

(हेही वाचा – Harishchandragad Trek : या खास कारणांसाठी प्रसिद्ध आहे हरिश्चंद्रगड ट्रेक!)

विश्रामबाग वाड्याचा इतिहास

विश्रामबाग वाडा (Vishrambaug Wada) हा १८०७ साली बांधला गेला. त्याकाळी हा वाडा बांधण्यासाठी रु. २००,००० एवढी रक्कम लागली. या वाड्याचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी सहा वर्षं लागली.

तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धामध्ये पराभव होण्याआधी बाजीराव दुसरे या वाड्यामध्ये अकरा वर्षं राहिले होते. त्यांचा युद्धात पराभव झाल्यानंतर इंग्रजांनी त्यांना पेन्शन देऊन कानपूरजवळच्या बिठुर या ठिकाणी हद्दपार केलं.

(हेही वाचा – बंडखोरी सहन केली जाणार नाही; Amit Shah यांचा इच्छुकांना सज्जड दम)

१८२१ साली पुण्याच्या नवीन ईस्ट इंडिया कंपनीच्या शासकांनी शहरात संस्कृत शिक्षण सुरू ठेवण्यासाठी या वाड्यात हिंदू महाविद्यालय सुरू केलं. हे कॉलेज पुढे कालांतराने डेक्कन कॉलेज बनलं. वाड्याच्या बाहेर विश्रामबाग हायस्कूल नावाचं हायस्कूलही सुरू झालं होतं.. १८७१ साली जाळपोळीमुळे वाड्याचा पूर्वेकडचा भाग पूर्णपणे नष्ट झाला.

१९३० साली तत्कालीन पुणे नगरपालिकेने वसाहतवादी बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारकडून रु. १००,००० एवढ्या किंमतीला हा वाडा विकत घेतला. १९५९ सालापर्यंत महापालिका आणि पुणे महानगरपालिका म्हणजेच PMC ही विश्रामबाग वाड्यातून आपला कार्यभार सांभाळत होती. २००३ सालापर्यंत पीएमसी विभागाची अनेक कार्यालयं वाड्यातचं होती.

(हेही वाचा – Britannia Industry : बिस्किटं आणि मधल्या वेळचा फराळ बनवणाऱ्या ब्रिटानिया कंपनीचं कुठलं उत्पादन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं?)

विश्रामबाग वाड्याचा जीर्णोद्धार

PMC ने हेरिटेज कॉरिडॉर योजनेअंतर्गत विश्रामबाग वाड्याच्या (Vishrambaug Wada) जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं. हे काम तीन टप्प्यांत केलं गेलं. मूळचा विटांच्या वाड्याचा खास जीर्णोद्धार केला गेला. त्याचप्रमाणे काही खिडक्या लाकडी खांब आणि आकृतिबंध यांचाही जिर्णोद्धार केला गेला. २००४ सालापर्यंत रु. २,५००,००० एवढी रक्कम विश्रामबाग वाड्याच्या जीर्णोद्धाराच्या कामावर खर्च करण्यात आली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.