-
ऋजुता लुकतुके
विवो कंपनीने (Vivo company) किफायतशीर दरांत सगळे स्मार्ट फिचर असलेले फोन आणून आशियाई बाजारपेठेंत क्रांती केली आहे. आणि पुढे त्यांच्या रणनीतीवर आधारित कितीही मोबाईल कंपन्या निघाल्या तरी विवोनं आपली विश्वासार्हता कायम ठेवली आहे. आता विवो आपल्या टी३ या फोनची पुढची पिढी म्हणजे टी४ बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. २० ते २५ हजार रुपयांच्या दरम्यानची किंमत, ७,३०० एमएएच क्षमतेची तगडी बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन सातव्या पिढीतील प्रोसेसर यामुळे हा फोन सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार हे नक्की आहे. या फोनबद्दल फारशी माहिती कंपनीने अधिकृतपणे दिलेली नाही. पण, एप्रिलमध्येच तो लाँच होईल अशी शक्यता आहे. (Vivo T4 5G)
८ जीबी ते १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी तसंच २५६ जीबींचं स्टोरेज असे विविध पर्याय तुम्ही निवडू शकाल. आणि साधारण १९,९९९ रुपयांपासून त्याची किंमत सुरू होईल. फोनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ७,३०० एमएएच क्षमतेची बॅटरी हेच असेल. आयक्यूओओ नंतर इतकी मोठी बॅटरी लाँच करणारी विवो ही पहिली भारतीय कंपनी असेल. आधीच्या टी३ मध्ये ५,००० एमएएच बॅटरी असताना नवीन फोनमध्ये झालेला हा सगळ्यात मोठा बदल आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये येईल ९० डब्ल्यू क्षमतेचा फास्ट चार्जर. त्यामुळे शून्य ते ५५ टक्के चार्जिंग फक्त ३० मिनिटांत होऊ शकेल.
(हेही वाचा – “पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय हुशार व्यक्ती”; Donald Trump यांनी प्रशंसा करत आयात शुल्काबाबत दिला इशारा)
Vivo T4 5G – A Power-Packed Mid-Ranger! 🚀🔥
📱 6.67″ Quad Curved 120Hz AMOLED
⚡ Snapdragon 7s Gen 3
📸 50MP OIS Rear | 32MP Front
💾 UFS 3.1 Storage
🔋 7,300mAh | 90W Charging
📌 Android 15 | FuntouchOS 5#VivoT4 #VivoT45G #Snapdragon7sGen3 #Smartphones pic.twitter.com/LUvYZxMo5l— Pro Tech Village (@ProTechVillage1) March 25, 2025
(हेही वाचा – Kunal Kamra च्या विरोधात 3 नवीन गुन्हे दाखल !)
फोनची बॅटरी इतकी मोठी असतानाही फोनचा आकार त्या मानाने स्लिम असाच आहे. फोनची जाडी अजिबात वाढलेली नाही. फोनचा डिस्प्ले ६.६७ इंचांचा असेल. आणि एमोल्ड क्वाड कर्व्ह्ड डिस्प्ले असेल. तसंच रिफ्रेश रेट १२० हर्टर्झचा असेल. विवोने आपल्या आधीच्या टी३ फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर वापरला होता. पण, आता कंपनीने टी४ साठी स्नॅपड्रॅगन सातव्या पिढीतील प्रोसेसर वापरला आहे. तर हा फोन अँड्रॉईड १५ प्रणालीवर आधारित असेल. (Vivo T4 5G)
फोनचा कॅमेरा सोनी आयएमएक्स सेन्सर असलेला ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल. आणि वाईड फोटोंसाठी २ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेराही असेल. तर सेल्फी कॅमेराही ३२ मेगा पिक्सेलचा असेल. फोनचे अनेक फोटो आतापर्यंत लीक झाले आहेत. आणि त्यानुसार, फोनचं डिझाईन हे आकर्षक आणि आधुनिक असल्याचं दिसतंय. शिवाय २० ते २५ हजार रुपयांदरम्यानचा फोन हा त्याचा युएसपी असेल. (Vivo T4 5G)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community