- ऋजुता लुकतुके
विवो फोनची वी३० मालिका मार्च महिन्यात भारतात लाँच झाली आहे. वी३० आणि वी३० प्रो अशी दोन मॉडेल यात आहेत. आणि प्रो फोन हा अत्याधुनिक सुविधांनी भरलेला आहे. सक्षम कॅमेरा, वेगवान प्रणाली आणि दीर्घ काळ चालणारी बॅटरी अशी प्रो मॉडेलची वैशिष्ट्य आहेत. (VIVO V30)
या फोनचा डिस्प्ले ६.७८ इंचांचा एमोल्ड डिस्प्ले आहे. आणि त्याची प्रखरता इतकी आहे की, चित्रपट, वेबसीरिज, तुमचा लाडका गेम आणि इतर कुठलाही आवडता मजकूर तुम्ही इथं स्पष्टपणे पाहू शकता. गेमिंगचा अनुभव तर खूपच चांगला असेल. ५० मेगा पिक्सलचा मूलभूत कॅमेरा, तेवढ्याच क्षमतेची अल्ट्रा वाईड लेन्स आणि ५० मेगा पिक्सलचीच टेलिफोटो लेन्स ही बारकाईने फोटो टिपण्यासाठी सक्षम आहे. या व्यतिरिक्त या फोनमधील सेल्फी कॅमेराही ५० मेगा पिक्सल क्षमतेचाच आहे. (VIVO V30)
The all-new #vivoT3 5G is here to level up your multitasking game at turbo speed. When it comes to #GenTurbo, we aren’t here to take part, we’re here to take over. Are you ready to join the club and #GetSetTurbo?
Buy now. https://t.co/NnX6bAxDRc#vivoT3 #5G #vivoSeriesT… pic.twitter.com/bQHm6soFEr
— vivo India (@Vivo_India) March 27, 2024
(हेही वाचा – Novak Djokovic : नोवाक जोकोविचने गोरान इव्हानोसेविचबरोबरची भागिदारी का मोडली?)
या मॉडेलची किंमत आहे इतकी
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ व्या पिढीचा दुसरा प्रोसेसर या फोनमध्ये वापरण्यात आलाय. त्यामुळे गेमिंगसाठी हा फोन चांगला आहेच. शिवाय एकाच वेळी अनेक ॲप बिनदिक्कत वापरण्याची कामगिरी हा फोन चोख बजावू शकतो. त्यासाठी १२ जीबीची रॅमही यात देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज क्षमता २५६ जीबींची आहे. (VIVO V30)
फोनची बॅटरी ५,००० एमएएच इतकी आहे. त्यामुळे एकदा चार्ज केल्यावर फोन तीन दिवसही चालू शकतो. आणि सगळी ॲप वापरात असतानाही फोन दिवसभर चालू शकतो. शिवाय फोनबरोबर येणारा ८० वॅट क्षमतेचा रॅपिड चार्जर तर फोनचा युएसपी आहे. अर्ध्या तासात हा चार्जर फोन पूर्णपणे चार्ज करू शकतो. तर फोनमधील अँड्रॉईड १४ ऑपरेटिंग प्रणालीही सध्याची बाजारातील सगळ्यात सक्षम प्रणाली आहे. या फोनचं ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेलं व्हर्जन ३३,९०० रुपयांना उपलब्ध आहे. तर तर सगळ्यात जास्त १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ३७,९९९ रुपये इतकी आहे. (VIVO V30)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community