जागतिक अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत आहे. नवनवीन कल्पना, डिजिटलायझेशन लोकांचे कुठे आणि कसे काम करायचे, याचे निकष बदलले आहेत. त्यामुळे आता व्यावसायिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमातही आमूलाग्र बदल घडवले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) मध्ये इयता ६ पासून व्यावसायिक प्रशिक्षण समाविष्ट करण्याची आणि सर्व शाळांमध्ये त्याचा प्रसार करण्याची शिफारस केली गेली आहे, असे मत शिक्षण, सल्ला आणि कौशल्य सेवा, अँपरसँडचे सीओओ अनुराग गुप्ता म्हणाले.
कौशल्य विद्यापीठे आणि रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग (आरपीएल) कार्यक्रम वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. त्यात सर्वांना नोकरीसाठी किंवा उद्योजक म्हणून तयार करण्यावर भर दिला गेला आहे. औपचारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर लक्ष केंद्रित केले गेले पाहिजे, तरच रोजगार क्षमता वाढू शकेल, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.
उपजीविका आणि उद्योजकतेवर लक्ष
वारंवार लॉकडाऊनमुळे शहरापासून गावाकडे झालेल्या स्थलांतरामुळे आणि स्थलांतरीत मजूर पुन्हा शहकाकडे येण्यास अनैच्छिक असल्यामुळे आता स्थानिक पातळीवरच उपजीविका आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करणे काळाची गरज दिसते, जेणे करून अजून रोजगार निर्मिती होवू शकेल. याकरिता व्यावसायिक शिक्षणात अशी कौशल्ये प्रदान करणे आवश्यक आहे जे लोकांची व्यावसायिक दृष्टी विकसित करण्यास आणि स्थानिक समस्यांचे निराकरण नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्यात मदत करतील, असे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत जे शालेय विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगांची ओळख करून देणारे आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रोत्सहन देत आहेत, असेही गुप्ता म्हणाले. या व्यतिरिक्त, संकल्प योजने अंतर्गत जिल्हा कौशल्य समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जेणे करून आम्ही तळागाळातील कौशल्य विकासाच्या विकेंद्रीकरणावर लक्ष केंद्रित करणार आहोत. यामुळे उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल.
(हेही वाचा ‘या’ रशियन पक्ष्याला हवीहवीशी वाटणारी मुंबई झाली नकोशी!)
भविष्यातील कौशल्यांवर लक्ष केंद्रित
व्यावसायिक शिक्षण मुख्य क्षेत्रांमधून तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्र आणि ग्रीन जॉब्सकडे वळेल. ग्रीन एनर्जी इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि डेटा अॅनालिटिक्स असे काही क्षेत्र आहेत जेथे नवीन युगातील तंत्रज्ञानाशी संबंधित तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षित व्यावसायिकांची मागणी वाढताना दिसत आहे. वाढत्या प्रमाणात मॅन्युअल आणि शारीरिक कौशल्यांची मागणी आता तांत्रिक, समाजिक आणि भावनिक आणि उच्च संज्ञानात्मक कौशल्यांनी घेतली आहे, असेही अनुराग गुप्ता म्हणाले.
Join Our WhatsApp Community