Voltas Share Price : वोल्टासच्या वाटचालीला संशोधन संस्थांच्या अहवालानंतर ब्रेक

Voltas Share Price : उन्हाळ्यात एसी आणि फ्रिज या दोन्ही उत्पादनांची मागणी वाढते.

32
Voltas Share Price : वोल्टासच्या वाटचालीला संशोधन संस्थांच्या अहवालानंतर ब्रेक
  • ऋजुता लुकतुके

उन्हाळ्यात वातानुकूलन यंत्रणा तसंच रेफ्रिजरेटर अशा दोन्ही इलेक्ट्रिक उत्पादनांची मागणी वाढते आणि ते लक्षात घेता टाटा समुहातील कंपनी वोल्टासवर भारतासह परकीय संशोधन संस्थांनीही खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शेअर मार्च महिन्यात तेजी पकडत असतानाच अचानक भारतातील एक संशोधन कंपनी प्रभूदास लिलाधर यांनी वोल्टाससाठीचं लक्ष्य थोडं कमी करून ते १,५९३ वर आणलं. त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी वोल्टासच्या तेजीला थोडा ब्रेक लागला. शुक्रवारी शेअरमध्ये २ टक्क्यांची पडझड झाली आणि सध्या शेअर १,४३२ वर स्थिरावला आहे. पण, अजूनही शेअरमध्ये ११ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे आणि उन्हाळ्याचा हंगाम बघता अनेक जाणकार हे वोल्टासवर अजूनही सकारात्मक आहेत. (Voltas Share Price)

याशिवाय वोल्टास कंपनीने याच आठवड्यात आपल्या भागिदारांशी आणि शेअरमधील गुंतवणूकदारांशी संवाद साधला. यात उन्हाळ्याचा हंगाम लक्षात घेता, कुठल्या नवीन विक्री योजनांवर कंपनी काम करत आहे, हे त्यांनी समजावून सांगितलं. गेल्या हंगामात कंपनीची उन्हाळ्यातील विक्री तुफान होती. इतर कंपन्या आणि एकूणच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं क्षेत्र जिथे ३० टक्क्यांनी वाढलं तिथे वोल्टासने ३५ टक्के वाढ अनुभवली. यावेळी विक्री आणखी वाढवण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. (Voltas Share Price)

(हेही वाचा – World Climate Day : निसर्ग आणि मानवी जीवन संकटात)

New Project 2025 03 23T081044.235

शुक्रवारी शेअरमध्ये पडझड झाली असली तरी मागच्या महिनाभरात शेअर १२ टक्क्यांनी वाढला आहे. आणि संशोधन संस्थांनी दिलेलं लक्ष्य पाहता हा शेअर आणखी वर जाऊ शकतो, असा अंदाज आहे. काही संशोधन संस्थांनी दिलेला अंदाज पाहूया, (Voltas Share Price)

संशोधन संस्था

रेटिंग

लक्ष्य

मॉर्गन स्टॅनले

ओव्हरवेट

१,५५६

सीएलएसए

होल्ड

१,३७५

नोमुरा

न्यूट्रल

१,४०४

नुवामा

खरेदी करा

१,८१०

अँटिक

खरेदी करा

१,७७९

 

एकूण ३९ संशोधन संस्थांनी वोल्टास या शेअरचा अभ्यास केला आहे. यातील २८ संस्थांनी वोल्टासवर खरेदीचा सल्ला दिला आहे. (Voltas Share Price)

(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीवर कुठलाही सल्ला देत नाही)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.