- ऋजुता लुकतुके
वॉल्वो या स्विडिश कारमेकर कंपनीने आपली बहुचर्चित ईएक्स९० ही पूर्णपणे इलेक्ट्रिक कार जागतिक बाजारपेठेत लाँच केली आहे. एनव्हीडिआ ड्राईव्ह ओएस या संगणक प्रणालीवर चालणारी ही कार बरीचशी स्वयंचलित आहे. म्हणजे हा संगणक चालकाला अनेक प्रकारच्या सुरक्षात्मक सूचना करू शकतो. त्यामुळे या गाडीला धावता संगणक अशीच उपमा मिळाली आहे. ईएक्स९० आणि ईएक्स३०. या दोन्ही गाड्यांचं बुकिंग २०२४ च्या मध्यावर सुरू होईल. त्या २०२५ च्या सुरुवातीला रस्त्यावर धावताना दिसतील, अशी शक्यता आहे. वॉल्वोची आधीची एक्ससी९० बंद होऊन त्या जागी ईएक्स९० बाजारात येईल, अशी शक्यता आहे. (Volvo EX90)
ईएक्स९० गाडी ५ सीटर आणि ७ सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. शिवाय ही गाडी फ्रंट-व्हील ड्राईव्ह तसंच ऑल-व्हील ड्राईव्ह अशा दोन प्रकारात ग्राहकांना उपलब्ध असेल. गाडीची सर्वोत्तम क्षमता ५१५ बीपीएच आणि रेंज ५९० किमींची असेल. या गाडीत स्वयंचलित वाहन यंत्रणा तसंच दोन डिस्प्ले आणि क्लायमॅट कंट्रोलही असणार आहे. जगभरात या गाडीचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर गाजतो आहे. (Volvo EX90)
(हेही वाचा – Neeraj Chopra : डाव्या हाताचं हाड मोडलेलं असताना नीरज खेळला डायमंड्स लीगची अंतिम फेरी )
Volvo EX90 – 1st Look at this Luxury All-Electric 7 Seaterhttps://t.co/XK0KXR5N8H pic.twitter.com/kLKNrFmtay
— Derek Reilly (@derekreilly) March 11, 2024
तर वॉल्वो कंपनीची सबएसयुव्ही असलेली ईएक्स३० ही कार २०२३ पासून भारतीय रस्त्यांवर धावतेय. ही कार सिंगल मोटर किंवा डबल मोटरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारची रेंज ३४० किमी ते ४६० किमी अशी आहे. तर या इंजिनाची क्षमता २७६ बीएचपी ते ४२८ बीएचपी इतकी आहे. (Volvo EX90)
ईएक्स९० आणि ईएक्स३० गाड्यांनी वॉल्वो कंपनीने इलेक्ट्रिक कार क्षेत्रात आता मोठी मुसंडी मारली आहे. जुन्या आयसीई क्षेत्राकडून कंपनीने इलेक्ट्रिक गाडीकडे आपलं लक्ष वळवलं आहे. (Volvo EX90)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community