-
ऋजुता लुकतुके
वॉल्वोची एक्ससी९० (Volvo XC90 2025) ही गाडी आता नवीन स्वरुपात लोकांसमोर येत आहे. गाडीचं फेसलिफ्ट व्हर्जन नुकतंच कंपनीने बाहेर आणलं. गाडीचं इंटिरिअर (Interior) आणि एक्सटिरिअल (Exterior) म्हणाल तर ते बऱ्यापैकी वॉल्वोच्या ईएक्स९० (Volvo EX90) गाडीसारखंच आहे. फक्त ती गाडी पूर्णत: इलेक्ट्रिक आहे. एक्ससी९० ही एसयुव्ही गाडी पेट्रोलवर चालेल. यात डिझेल इंजिनाचा पर्याय कंपनीने दिलेला नाही. आधीच्या पाच रंगांबरोबरच आता नवीन एक्ससी९० गाडी मलबेरी रेड या सहाव्या रंगातही उपलब्ध असेल.
एनव्हीडिआ ड्राईव्ह ओएस (NVIDIA DriveOS) या संगणक प्रणालीवर चालणारी ही कार बरीचशी स्वयंचलित आहे. म्हणजे हा संगणक चालकाला अनेक प्रकारच्या सुरक्षात्मक सूचना करू शकतो. त्यामुळे या गाडीला धावता संगणक अशीच उपमा मिळाली आहे.
(हेही वाचा – Lucknow होणार पहिली एआय सिटी; उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांची माहिती)
एक्ससी९० (Volvo XC90 2025) गाडी ५ सीटर आणि ७ सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. शिवाय ही गाडी फ्रंट-व्हील ड्राईव्ह तसंच ऑल-व्हील ड्राईव्ह अशा दोन प्रकारात ग्राहकांना उपलब्ध असेल. या गाडीत स्वयंचलित वाहन यंत्रणा तसंच दोन डिस्प्ले आणि क्लायमॅट कंट्रोलही असणार आहे. जगभरात या गाडीचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर गाजतो आहे.
.@volvocarsin has launched the 2025 XC90 in India at ₹1.02 crore (ex-showroom).
On the safety front, #Volvo has equipped the SUV with Level 2 ADAS, a 360-degree camera, hill start and descent control, electronic parking brake, and parking assistance.#VolvoXC90 #SUVLaunch… pic.twitter.com/lW2k20dcnO
— OVERDRIVE (@odmag) March 4, 2025
(हेही वाचा – BMC : मुंबईतील मोठ्या नाल्यांसह मिठी नदीच्या सफाई कामांच्या निविदेतच घोटाळा; मनसेने केली एसआयटीमार्फत चौकशीची मागणी)
आपली गाडी पर्यावरणपूरक असावी असा वोल्वो कंपनीचा प्रयत्न असतो. त्यामुळे गाडीचा डॅशबोर्ड हा पूर्णपणे रिसायकल्ड मटेरियलने बनलेला आहे. बाकी गाडी ईएक्स९० (Volvo EX90) प्रमाणेच आहे. गाडीत ११.२ इंचांचा मोठा डिस्प्ले आहे. गुगलवर आधारित मध्यवर्ती यंत्रणा आहे. पॅनोरमिक सनरुफ आहे. गाडीच्या पुढच्या बाजूला ३६० अंशांत फिरणारा सुरक्षा कॅमेरा आहे. (Volvo XC90 2025)
या गाडीत २.० माईल्ड हायब्रीड टर्बो पेट्रोल इंजिन बसवण्यात आलं आहे. २५० हॉर्सपॉवर आणि ३६० एनएम टॉर्क इतकी शक्ती हे इंजिन निर्माण करू शकतं. शून्य ते १०० ताशी किमींचा वेग गाठण्यासाठी गाडीला ७ सेकंदं लागतात. आधीच्या गाडीच्या तुलनेत या फेसलिफ्ट गाडीसाठी तुम्हाला २ लाख रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. म्हणजेच नवीन गाडीची किंमत आहे १.०३ कोटी रुपये. तर या गाडीची स्पर्धा मर्सिडिझ बेंझ जीएलई, बीएमडब्ल्यू एक्स५ आणि आऊडी क्यू७ या गाड्यांशी असेल. (Volvo XC90 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community