पुण्यातील वृषाली शेडगे यांनी ६० मिनिटांत ६१ महिलांचा ब्रायडल मेकअप करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. यापूर्वी वृषाली यांनी २०१७ मध्ये भारतीय वधूची स्पर्धा जिंकली होती. २०१९ मध्ये त्यांनी हा विक्रम करण्याचा प्रयत्न केला होता परंतु कोरोनामुळे त्यांनी याला स्थिगिती दिली होती यानंतर वृषाली यांनी अण्णा भाऊ साठे सभागृहात बुधवार ९ नोव्हेंबरला ब्रायडल मेकअप करण्याचा विक्रम केला आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या विक्रमाची चर्चा सुरू आहे.
( हेही वाचा : दक्षिण भारतात ‘वंदे भारत’ आणि ‘भारत गौरव काशी दर्शन’ ट्रेनचा शुभारंभ! पहा क्षणचित्रे… )
१० वर्ष या क्षेत्रात कार्यरत
गेल्या १० वर्षांपासून वृषाली शेडगे या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिकवले आहे. त्यामुळे आज त्यांना सर्वत्र International Make-Up Artist म्हणून सन्मान आहे. लग्नानंतर त्यांच्या पतीनेही त्यांना या कामात मदत केली. २०१७ मध्ये त्यांनी इंडिया ब्रायडल मेकअप स्पर्धा जिंकली आहे. तर महाराष्ट्रात आतापर्यंत ४६ मेकअप सेमिनार आणि ५०० हून अधिक वर्कशॉप घेतले आहेत.
६० मिनिटांत ६१ महिलांचा मेकअप
अशा या मराठमोळ्या वृषाली शेडगेंनी फक्त ६० मिनिटांत ६१ महिलांचा मेकअप करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. त्यांच्या या विक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Join Our WhatsApp Community