-
ऋजुता लुकतुके
पर्यावरणपूरक ऊर्जेच्या क्षेत्रात अल्पावधीतच नाव कमावलेली वारी रिन्युएबल्स ही कंपनी शेअर बाजारात सध्या दबावाखाली आहे. सध्या तिमाही निकालांचा हंगाम आहे. आणि कंपनीचा तिमाही निकाल याच आठवड्यात जाहीर झाला आहे. त्यानंतर ए्कट्या गुरुवारी (१६ जानेवारी) कंपनीचा शेअर ७ टक्क्यांनी खाली आला. कारण, कंपनीचा तिमाही निकाल काहीसा खराब लागला आहे. कंपनीचा तिमाही नफा केवळ ५३.२० कोटी रुपये इतका आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत असलेल्या निव्वळ नफ्यापेक्षा हे प्रणाण १७ टक्क्यांनी कमी आहे. कंपनीचा उत्पादनातून येणारा महसूल मात्र ११ टक्क्यांनी वाढून ३६० कोटींवर पोहोचला आहे. (Waaree Renewables Share Price)
(हेही वाचा- SSC & HSC Board Exam 2025 : परीक्षा मंडळाचा ‘जात प्रवर्ग’चा निर्णय अखेर रद्द; नवे हॉल तिकीट मिळणार!)
गुरुवारच्या पडझडीनंतर शुक्रवारीही शेअरमध्ये आणखी ३ टक्क्यांची घसरण झाली. आणि बाजार बंद होताना शेअर ३ टक्क्यांच्या घसरणीनंतर १,०४४ रुपयांवर बंद झाला आहे. गेल्या महिनाभरात शेअरमध्ये २८ टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीने गुंतवणूकधारकांना २ रुपये दर्शनी मूल्याच्या एका शेअरवर १ रुपये इतका लाभांश मात्र जाहीर केला आहे. (Waaree Renewables Share Price)
वारी रिन्युएबल्स ही कंपनी सौरऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहे. वैयक्तिक आणि संस्था तसंच कंपन्यांना मोकळ्या जागेत गरजेनुसार, सौरऊर्जा पॅनल बसवून देण्याचं काम ही कंपनी करते. खरंतर २०२४ च्या ऑक्टोबर महिन्यात कंपनीचा आयपीओ बाजारात आला होता. नवीन बिझिनेस मॉडेल असलेल्या या कंपनीला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. आणि १४२७ ते १,५०३ प्राईस बँड असलेला शेअर पहिल्याच दिवशी १० टक्क्यांनी वर पोहोचला होता. त्यानंतर महिनाभरातच कंपनीने ३,०३७ रुपयांचा भावही गाठला. कंपनीकडे तेव्हा नवनवीन ऑर्डर होत्या. आणि सौरऊर्जा क्षेत्रातील मक्तेदारी कंपनीकडे होती. (Waaree Renewables Share Price)
(हेही वाचा- Saif ali khan वर हल्ला करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात; ठाण्यातून अटक)
सुरुवातीच्या प्रतिसादानंतर मात्र मूल्यांकन वाढल्यावर शेअरमध्ये नफारुपी विक्रीचा जोर सुरू झाला. त्यातच यावर्षी ७ जानेवारीला कंपनीचे सीएफओ दिलीप पंजवानी यांनी कंपनीतून तडकाफडकी राजीनामा दिला. आणि त्यानंतर शेअरमध्ये घसरण सुरू झाली आहे. शिवाय तिमाही निकाली खराब आहेत. गेल्या महिनाभरात कंपनीचा शेअर २८ टक्क्यांनी खाली आला आहे. आनंद राठी या संशोधन संस्थेनं दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शेअर चांगला असल्याचं म्हटलंय. तर एसबीआय सेक्युरिटीजने शेअरविषयी सबुरीचा सल्ला दिला आहे. (Waaree Renewables Share Price)
(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. आणि गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरविषयी कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community