सिंधुदुर्गात हत्तींची भटकंती

104

खाद्याच्या शोधात हत्तींच्या कळपाची सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात भटकंती सुरु झाली आहे. हा हत्तींचा कळप फार काळ एकाच गावात थांबत नाही. हे हत्ती दोडामार्ग तालुक्यात फिरत आहेत. केरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामाला असलेला हत्तींचा कळप सोमवारी मोर्लेत पोहचला.

( हेही वाचा : गुगलमध्ये ‘हे’ सर्च कराल तर थेट जेलमध्ये जाल )

हत्तींचे दर्शन

संपूर्ण दिवसभर हा कळप गावालगतच्या जंगलात होता. त्यावेळी तेथील यशवंत गवस आणि अविनाश चिरमुरे यांनी या हत्तींच्या कळपाचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले. उन्हाळ्यात अनेक चाकरमानी सिंधुदुर्गात जातात त्यामुळे यांनाही या हत्तींचे दर्शन घडते.

केर, मोर्ले, सोनावल, पाळये, घोटगेवाडी, मेढे या गावात हत्तींची भटकंती सुरू आहे. परंतु हे हत्ती फार वेळ एका गावात थांबत नाहीत असा २००२ पासूनचा अनुभव गावकऱ्यांना आणि वनविभागाला आहे. हत्तींचा सर्वाधिक मुक्काम तिलारी धरणाच्या बुडित क्षेत्रात आणि घाटीवडे, बांबर्डे भागात असतो. त्यांना त्या भागात पाणी आणि खाद्य मोठ्या प्रमाणावर मिळते. केळीच्या बागा, फणस यासाठी हत्तींची गावोगावी भटकंती सुरु आहे. जिथे खाद्य मुबलक तिथे कळप स्थिरावतो, नाहीतर पुढच्या गावी निघून जातो. त्यांच्या प्रवासादरम्यान अनेकांना त्यांचे दर्शन घडते. अनेकजण या हत्तींचे फोटो आणि व्हिडिओही काढतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.