water lily flower : कमळ आणि वॉटर लिली एकच आहे की वेगवेगळी? जाणून घेऊया रोमांचक तथ्ये!

25
water lily flower : कमळ आणि वॉटर लिली एकच आहे की वेगवेगळी? जाणून घेऊया रोमांचक तथ्ये!

वॉटर लिली ही एक प्रकारची सुगंधी फुलांची वनस्पती आहे. ही वनस्पती स्थिर पाण्यात किंवा मंद गतीने वाहणाऱ्या पाण्यात वाढते. जगभरात वॉटर लिलीच्या सुमारे ६० प्रजाती आहेत. या वनस्पती तलावांमध्ये, तलावांच्या काठावर आणि पाण्याच्या मंद प्रवाहांमध्ये आणि उष्णकटिबंधीय तसंच सौम्य वातावरणात वाढतात. वॉटर लिलीच्या तरंगत्या पानांना लिली पॅड असं म्हणतात. (water lily flower)

वॉटर लिली ही वनस्पती निम्फेएसी परिवारातील आहे. या वनस्पतीतून फुले आणि बिया तयार होतात. या वनस्पतीची पानं आणि फुलं पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात. त्यांना तलावांचं रत्न देखील मानलं जाते. ते सुंदर दिसणारे वनस्पती आहेत. काही उभयचर प्राणी वॉटर लिलीच्या पानांवर सुरक्षितपणे बसून राहतात म्हणून ते परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. वॉटर लिलीची फुलं डोळ्यांना खूप आनंद देतात. (water lily flower)

उन्हाळ्याच्या दिवसांत वॉटर लिलीची पानं पाण्यात राहणाऱ्या जलचर प्राण्यांना सावली देतात आणि पाण्याची उष्णता कमी करतात. ही पानं जास्त सूर्यप्रकाश पडण्यापासून रोखून पाण्यामधली शेवाळीची वाढ थांबवतात. एवढंच नाही तर ती पाण्यातून पोषक तत्वं शोषून घेतात आणि लहान माशांना आश्रय देतात. वॉटर लिलीची फुलं दिवसा उमलतात आणि संध्याकाळी पुन्हा बंद होतात. जर वॉटर लिलींच्या वनस्पतींना योग्य वातावरण मिळालं तर त्या १५-२० वर्षं जगू शकतात. (water lily flower)

(हेही वाचा – Ind vs Eng, 1st ODI : हर्षित, यशस्वीचं एकदिवसीय पदार्पण, दोघांना भारतीय कॅप मिळाल्या तो क्षण)

लिली पॅड्स म्हणजे काय?

वॉटर लिलीची पानं ६ फूट उंचीपर्यंत वाढतात. सामान्यतः पाने पृष्ठभागावर तरंगतात पण कधीकधी ती पाण्याखाली देखील असू शकतात. लिली पॅड्स म्हणजे वॉटर लिलीची तरंगणारी पानं होय. ती खूप आकर्षक दिसतात. वॉटर लिलीच्या फुलांचा आकार वेगवेगळा असतो. ती गोलाकार, हृदयाच्या किंवा ढालीच्या आकाराची असू शकतात. वॉटर लिलीची फुलं दिसायला रुंद असतात. (water lily flower)

लिली पॅड्स हे प्रकाशसंश्लेषणासाठी वनस्पतीला अधिकाधिक प्रकाश देण्याचं काम करतात. लिली पॅड्स हे वॉटर लिलींना पाण्यात टिकून राहण्यासाठी अनुकूल आहेत. वॉटर लिलीची फुलं वेगवेगळ्या रंगांची असतात. जसं की गुलाबी, पांढरी, पिवळी आणि लाल इत्यादी. लिली पॅड्स हे ३-४ आठवडे टिकतात. त्यानंतर ते मरून तलावात बुडतात. तणनाशके ही वॉटर लिली पॅड्ससाठी हानिकारक असतात. (water lily flower)

वॉटर लिलीमध्ये अनुकूलन हा असा गुणधर्म आढळतो जो कोणत्याही वातावरणात वनस्पतीला टिकून राहण्यास मदत करतो. वॉटर लिलीच्या पानांवर हवेने भरलेले पोकळ लांब पानांचे देठ असतात. ते वनस्पतीला पाण्यावर तरंगण्यास मदत करतात. वॉटर लिलीच्या पानांवर मेणाचं आवरण असतं. पानांचे पाते रुंद असतात. पानांच्या फक्त हवेत उघड्या भागांवर स्टोमाटा असतो. लिली पॅडच्या मदतीने प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी वॉटर लिलींना अधिक सूर्यप्रकाश मिळतो. (water lily flower)

(हेही वाचा – Fire in Mahakumbh: महाकुंभमेळा परिसरात पुन्हा लागली आग ; ५ मिनटांत मिळवले नियंत्रण)

वॉटर लिलीबद्दल आणखी काही तथ्ये खालीलप्रमाणे आहेत :
  • वॉटर लिलीची फुलं वेगवेगळ्या रंगांची असतात.
  • वॉटर लिली ही वनस्पती परिसंस्थेची भूमिका बजावते.
  • वॉटर लिलीला ‘जुलैचं बर्थ फ्लॉवर’ म्हणूनही ओळखलं जातं.
  • कला जगात, वॉटर लिलीला एक विशेष महत्त्व आहे.
  • वॉटर लिलीची वनस्पती सर्व प्रकारच्या तापमानात वाढू शकते.
  • वॉटर लिलीची फुलं आशिया, अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. (water lily flower)

(हेही वाचा – valentine’s day quotes : व्हेलेंटाईन डे येतोय; तुमची तयारी झालीय का? valentine’s day साठी सर्वोत्तम quotes वाचा इथे!)

कमळ आणि वॉटर लिलीमधील फरक
  • कमळ हे नेलुम्बो प्रजातीचे आहे. तर वॉटर लिली ही निम्फिया प्रजातीची आहे.
  • कमळाची फुलं ही पाण्याच्या वर वाढतात. तर वॉटर लिलीची फुलं पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात.
  • कमळाचं फूल आकाराने मोठं असतं. तर वॉटर लिलीचं फूल आकाराने लहान असतं.
  • कमळाच्या फुलांचे प्रकार फार कमी किंवा नाहीत. तर वॉटर लिलीच्या फुलांचे अनेक वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.
  • कमळाची पानं पातळ आणि कागदी असतात. तर वॉटर लिलीची पानं ही जाड आणि मेणासारखी असतात.
  • कमळाच्या फुलांच्या पाकळ्या गोलाकार असतात. तर वॉटर लिलीच्या फुलांच्या पाकळ्या टोकदार असतात. (water lily flower)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.