-
ऋजुता लुकतुके
गोवा राज्याला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला असल्यामुळे आणि पर्यटनाच्या नकाशावर आधीच असलेल्या लोकप्रियतेमुळे इथले समुद्री खेळ विशेष लोकप्रिय आहेत आणि त्यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधाही इथं उपलब्ध आहेत. अलीकडेच कलंगुट किनाऱ्यावर एक फेरीबोट उलटल्यामुळे अपघात झाला होता. पण, त्यानंतर इथं सुरक्षा नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. गोव्यात कोणत्या प्रकारचे समुद्री खेळ उपलब्ध आहेत ते आधी पाहूया, (Water Sports in Goa)
(हेही वाचा – यापुढे BJP मोफत योजनांचे आश्वासन देणार नाही; आसामपासून होणार प्रारंभ)
पॅरासिलिंग : पॅरासेलिंग म्हणजे तुम्हाला एक पॅराशूट बांधलेलं असतं आणि ते चक्क एक बोट खेचत असते. बोटीने वेग पकडला की, तुम्ही आकाशात उंच उडू लागता आणि वरून समुद्र किनारा तसंच एकूणच समुद्र यांचा सुंदर नजारा तुम्हाला पाहता येऊ शकतो.
जेट स्किईंग : जेट स्किईंगमध्ये समुद्रावर चालवायची मोटरसायकल. तुम्ही एकट्याने हा आनंद लुटू शकता. किंवा तुम्हाला ती चालवता येत नसेल तर तज्ञ चालकाच्या मागे बसून त्याचा आनंद लुटू शकता. समुद्राच्या लाटांवर वेगाने ही मोटरसायकर जाते तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो. समुद्री खेळांमधील हा सगळ्यात लोकप्रिय प्रकार आहे. (Water Sports in Goa)
(हेही वाचा – Pune Crime : गौरव आहूजा, भाग्येश ओसवाला दोघेही पोलिसांच्या ताब्यात; मित्रांनी आणले बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल)
बनाना बोट राईड : नावाप्रमाणेच केळ्याच्या आकाराची ही निमुळती बोट असते आणि पुढे चालक आणि मागेच ४ ते ५ लोक यावर बसू शकतात. दोन्ही बाजूंना पाय टाकून तुम्हाला या बोटीत बसावं लागतं. दुसरी वेगवान बोट या बनाना बोटीला समुद्रात खेचन नेते. लाटेबरोबर ही बोटही वरखाली होते. आणि त्यामुळे या बोटीची सफर जास्त मनोरंजक होते.
स्नोर्केलिंग : समुद्राच्या पाण्याच्या आत जाऊन पोहण्यासाठी स्नोर्केलिंग उपकरणं उपयोगी पडतात. स्नोर्केलिंग उपकरणं घालून पाण्यात उतरलं तर तोंडावरील मास्कमुळे तुम्हाला पाण्यातही श्वास घेता येतो. त्यामुळे पाण्यात फार खोल न जाता तुम्हाला समुद्रातील मासे आतून पाहता येतात. (Water Sports in Goa)
(हेही वाचा – Aurangzeb Tomb उखडून टाकणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्हालाही…)
स्कुबा डायव्हिंग : स्कुबा डायव्हिंगमध्ये तुम्ही समुद्रात थोडं खोल आत जाऊन तिथला नजारा पाहू शकता. तुम्हाला त्यासाठी खास वेगळा असा सूट परिधान करायला लागतो. आणि बरोबर ऑक्सिजनने भरलेला सिलिंडरही न्यावा लागतो. त्यामुळे पाण्याखाली राहूनही तुम्ही श्वास घेऊ शकता आणि समुद्गाच्या आतील वन्यजीवन पाहू शकता. पाणवनस्पती तसं मासे व अन्य जलजीव तुम्ही पाहू शकता. गोव्यातील समुद्र स्वच्छ असल्यामुळे इथं स्कुबा डायव्हिंगला मोठी मागणी आहे.
कयाकिंग : एका बोटीत बसून गोव्यातील बॅकवॉटर आणि त्यांच्या किनाऱ्यांवर वसलेली गाव पाहण्याचं हे साधन आहे. तुम्ही स्वत:ही बोट पॅडनी चालवू शकता. किंवा बरोबर त्यासाठी चालक ठेवू शकता. (Water Sports in Goa)
(हेही वाचा – Thane परिवहन सेवेतील महिला वाहक स्वप्नगंधा घाटे यांच्या कार्याचा दिल्लीत सन्मान)
गोव्यातील प्रत्येकच समुद्र किनारा तसा खास आहे. कलंगुट, बागा, अंजुना आणि कंडोलिम हे समुद्रकिनारे इथल्या वॉटरस्पोर्टर्ससाठी विशेष लोकप्रिय आहेत. प्रत्येक सफरीचे दर वेगवेगळे आहेत. आणि हंगाम तसंच गर्दीनुसार हे दर बदलतात. (Water Sports in Goa)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community