स्वप्नात आपल्याला न येणार्‍या भाषेतही आपण अस्खलित बोलतो; जाणून घ्या संशोधन काय सांगतं?

132

माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये झोपेचा देखील समावेश होतो. झोप व्यवस्थित होत नसेल तर अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे डॉक्टर चांगली झोप घेण्याचा सल्ला देतात. आता एका संशोधनातून असे समोर आले आहे की झोपेचा आणि भाषेचा देखील संबंध असतो. युनिव्हर्सिटी ऑफ याॅर्कच्या संशोधनातून हा शोध लागला आहे.

दोन रात्री आपण झोपतो तेव्हा आपल्या भाषेत एक नवीन शब्द जोडला जातो. या संशोधनानुसार आपली भाषा झोपेत अद्ययावत होत राहते आणि ही प्रक्रिया आयुष्यभर सुरु असते. आपण आपल्या अवतीभोवती जे शब्द ऐकतो ते शब्द आपण आपल्या स्वप्नात बोलतो. वयाच्या १० व्या वर्षांपर्यंत ही प्रक्रिया जलदगतीने होत असते. म्हणूनच विशेषतः लहान मुलांना व्यवस्थित आणि अधिक काळ झोप घ्यायला सांगितलं जातं. जेणेकरून भाषा शिकण्याची ही प्रक्रिया सतत सुरु राहील.

आपण दिवसभरात जे आवाज ऐकतो ते आपल्या अंतर्मनात घर करुन राहतात. युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कचे मानस वैज्ञानिक प्रा. गॅरेथ गॅसकेल यांच्यानुसार झोपेत आवाजा विषयी अधिक संवेदना निर्माण होते. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या भाषेत स्वप्न पडतं. काही स्वप्न तर अशा भाषेत पडतं, जी भाषा आपल्या बोलताही येत नाही. आपण कधीतरी ती भाषा किंवा ते शब्द ऐकलेले असतात. तरी आपल्या बहिर्मनाला याची कल्पना नसली तरी अंतर्मन मात्र याविषयी जागरूक असतं.

(हेही वाचा राहुल गांधींनी तोडले अकलेचे तारे; चीनचे कौतुक आणि काश्मीरबाबतही केले चुकीचे विधान)

ज्या लोकांना अनेक भाषा बोलता येतात, त्या लोकांना विविध भाषेत स्वप्न पडतात. अध्ययनात ज्या सहभागींनी सहभाग घेतला होता. त्यांना मुख्य भाषण आणि अर्थ नसलेले भाषण अशी दोन्ही भाषणे ऐकवली गेली. ईईजीद्वारे त्यांचा मेंदू स्कॅन करण्यात आला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की झोपलेल्या सहभाग्यांचा मेंदू केवळ मुख्य भाषण ऐकत होता. आणखी एक अद्भूत गोष्ट समोर आली की ज्या आवाजांमुळे स्वप्न तुटेल असे आवाज आपला मेंदू स्वप्नात ऐकत नाही.

प्रा. गॅरेथ यांना असंही जाणवलं की, आपण आपल्या स्वप्नाच्या शब्दकोशात नवे शब्द शोधत राहतो आणि ज्या शब्दांचे आपल्याला अर्थ देखील माहित नसतात, ते शब्द देखील स्वप्नात सुचतात. आपण ज्या गोष्टी नव्याने शिकतो, त्या गोष्टी मेंदूत सामावण्यासाठी झोपेची गरज असते. त्यामुळे व्यवस्थित आणि पूर्ण झोप घ्या. झोपाल तर शिकाल!

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.