लग्नामध्ये छान छान कपडे, सॅंडल्स, ज्वेलरी यासह हेअरस्टाईल खूप महत्वाची असते. सुंदर दिसणं हा महिलांचा अधिकार आहे. मात्र लग्नासाठी योग्य हेअरस्टाईल निवडणे हे तुमच्या ड्रेस निवडण्याइतकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या हेअर ट्रायलसाठी हेअर स्टायलिस्टला भेटता तेव्हा तुमच्या ड्रेस, कानातले आणि हेडपीसचे फोटो सोबत आणा. जेणेकरुन हेअर स्टायलिस्टला हेअर डिझाइन करताना सोपे पडे. आता आम्ही तुम्हाला काही हेअरस्टाईलची माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुम्ही त्या खास दिवशी दिसाल एकदम खास…
कपकेक ह्यूड बन-स्टाईल
ही वधूसाठी खास हेअर स्टाईल आहे. सध्या सर्वत्र ही स्टाईल ट्रेंड होत आहे! या हेअरस्टाईलमध्ये सुंदर फुले असतात, छान रंगछटा असतात. लग्न समारंभात या हेअर स्टाईलची निवड नक्की करु शकता. (Wedding Hairstyles For Women)
(हेही वाचा – Eknath Khadse : आपण भाजपामध्ये प्रवेश करणार; पण…; एकनाथ खंडसेंनी प्रवेशासंबंधी केले खुलासे)
डायमंड हेअर स्टाईल
ज्या नववधूंना खुल्या केसांची स्टाईल आवडते, पण यामध्येही ग्लॅम हवा असतो. तेव्हा तुम्ही हे डायमंड-स्टाईल हेअरबँड वापरुन ही सुंदर हेअर स्टाईल करु शकता. यात तुम्ही खूपच सुंदर दिसाल.
सफेद रंगाची ड्रीमी फ्लोरल वेणी
वेणी घालायला मुली लहानपणीच शिकतात. वेणी ही स्टाईल खूपच पारंपारिक आहे. मात्र यात नाविन्य आणलं तर तुमचं सौंदर्य आणखी खुलून दिसेल. या हेअरस्टाईलमध्ये वेणी घालून सफेद रंगांची कृत्रीम फुले माळली जातात. (Wedding Hairstyles For Women)
लो पोनी हेअरस्टाईल
जर तुम्हाला हेअरस्टाईलमध्ये फुले नको असतील, मात्र तरीही आकर्षकता हवी असेल तर लो पोनीटेल हेअरस्टाइल ही अतिशय उपयुक्त ठरु शकेल. या हेअरस्टाईलची खासियत अशी आहे की खालच्या बाजूचे केस थोडे मोकळे राहता आणि सडपातळ मुलींना ही हेअरस्टाईल खूपच शोभून दिसते. (Wedding Hairstyles For Women)
(हेही वाचा – Engineering Colleges In Nashik : नाशिकमध्ये सर्वोत्तम इंजिनियर कॉलेज शोधताय? मग हा लेख वाचा…)
रोज गार्डन
ही हाफ-ट्विस्टेड रोझ ब्राइडल हेअरस्टाईल खूपच जबरदस्त आहे. आजकालच्या मुलींची ही सर्वात आवडती हेअरस्टाईल आहे. हळदी किंवा मैत्रिणीच्या लग्नातही तुम्ही दिमाखात मिरवू शकाल. (Wedding Hairstyles For Women)
तर मैत्रिणींनो, ह्या हेअरस्ताईल ट्राय करुन पाहा आणि तुम्हाला काय अनुभव आला हे आम्हाला नक्की कळवा. मात्र आम्हाला खात्री आहे की, या हेअरस्टाईलमध्ये तुम्ही खूपच सोज्वळ आणि सुंदर दिसाल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community