मुंबईतील सागरी किनारा प्रकल्पानजीकच्या ब्रीच कॅण्डी रुग्णालय परिसराच्या भागांत व्हेल माशाचा मृतदेह आढळला. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाला सागरी किनारा प्रकल्पाचे काम पाहणा-या कंपनीच्या अधिका-यांनीच पाहिले. या मृतदेहातून फारच दुर्गंधी येत होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. घटनेबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या कांदळवन कक्षाने घटनास्थळी धाव घेतली.
( हेही वाचा : मांसाहारी खवय्यांच्या खिशाला चटका, वाढले चिकनचे भाव! )
वडाळा कांदळवनाच्या जागेत पुरण्यात आले
सुमारे २५ ते ३० फूटांच्या व्हेल माशाचा मृतदेह उचलताना अधिका-यांच्या चांगलीच नाकीनऊ आली. क्रेन आणि दोन जेसीबीच्या साहाय्याने व्हेल माशाचा मृतदेह उचलला गेला. मात्र एकाच वेळी महाकाय व्हेल माशाचा मृतदेह उचलताना त्यांच्या शरीरातील भाग आपोआपच जमिनीवर पडत होते. व्हेल माशाचा मृतदेह सडला होता, अशी माहिती अधिका-यांनी दिली. व्हेल माशाचा मृतदेह उचलण्याचे काम दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुरु होते. व्हेल माशाच्या कुजलेल्या मृतदेहाला वडाळा येथील कांदळवनाच्या जागेत पुरण्यात आल्याची माहिती वनाधिका-यांनी दिली.
Join Our WhatsApp Community