GST Inspector Salary : जीएसटी निरीक्षकाचा पगार, भत्ते व जबाबदाऱ्या काय आहेत?

जीएसटी निरीक्षक होण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते.

215
GST Inspector Salary : जीएसटी निरीक्षकाचा पगार, भत्ते व जबाबदाऱ्या काय आहेत?
GST Inspector Salary : जीएसटी निरीक्षकाचा पगार, भत्ते व जबाबदाऱ्या काय आहेत?
  • ऋजुता लुकतुके

तुम्हाला जीएसटी निरीक्षक म्हणून काम करायचं असेल तर त्यासाठी स्टाफ सिलेक्शन आयोगाची कम्बाईन्ड ग्रॅज्युएट स्तरावरील परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण करावी लागते. कुठल्याही शाखेतून स्नातक परीक्षा किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार या परीक्षेला बसू शकतात. तसंच उमेदवाराचं वय १८ ते ३० वर्षं या मर्यादेत असावं लागतं. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयात काही सूट मिळते. तुम्हाला ही सवलत लागू होणार असेल तर एसएससी आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पडताळणी करता येईल. (GST Inspector Salary)

ही स्पर्धा परीक्षा असून तुमच्याकडे असलेलं विश्लेषणात्मक कौशल्य, तार्किक कौशल्य, अंकगणित, बीजगणित याचबरोबर तुमच्या सामान्य ज्जानाचा कस या परीक्षेत लागतो. सुरुवातीला लेखी परीक्षा, ती उत्तीर्ण झाल्यास वाद-विवाद किंवा ग्रुप डिस्कशन आणि शेवटच्या फेरीत प्रकट मुलाखत अशी ही निवड प्रक्रिया असते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. (GST Inspector Salary)

आणि त्यानुसार, जीएसटी निरीक्षक या पदावरील उमेदवारांना अनुभव आणि सेवा ज्येष्ठतेनुसार, ४४,९०० ते १,४२,४०० रुपये इतका मासिक पगार मिळतो. मूळ पगारावर महागाई भत्ता, प्रवास भत्ता, घरभाडे भत्ता असे विविध भत्ते लागू होतात. घरभाड्याचा भत्ता हा तुमच्या नोकरीच्या ठिकाणावर अवलंबून असतो. (GST Inspector Salary)

जीएसटी निरीक्षक पदासाठी असलेल्या सरासरी पगाराची फोड बघूया,

नोकरीचा गट – सरकारी अराजपत्रित गट ब

ग्रेड पे – ४,६०० रु

पे स्केल – ४४,९०० ते १,४२,४०० रु.

गणवेश भत्ता – प्रतीवर्षी १०,००० रु

जीएसटी निरीक्षक पदोन्नती – सुपरिटेंडन्ट

हातात येणारा मासिक पगार – किमान ६८,००० रु.

जीएसटी निरीक्षकाला लेखी आणि तोडी परीक्षेबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीची परीक्षाही द्यावी लागते. आणि यात १६०० मीटरचं अंतर १५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करावं लागतं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.