जेव्हा तुम्ही बॅंकेतून किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडे कर्ज घेण्यासाठी अर्ज करता त्यावेळी तुमचे वय, उत्पन्न, व्यवसाय, व्यवसाय कसा चालला आहे याशिवाय तुमचा क्रेडिट स्कोअर सुद्धा पाहिला जातो. त्यामुळे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर चांगले ठेवावे लागतो. क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी या आहेत टिप्स…
( हेही वाचा : ‘घोडेबाजार’ शब्दाचा अर्थ आहे तरी काय?)
क्रेडिट स्कोअर चांगला ठेवा
- क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. किंवा कर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल.
- अनेक बॅंका क्रेडिट स्कोअर बघून अर्जाचा विचार करायचा की नाही हे ठरवतात.
- EMI ची डेडलाईन चुकवल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. त्यामुळे नेहमी EMI तारखेच्या आत भरा.
- गरज असेल तेव्हाच कर्ज घ्या. तसेच स्कोरमध्ये सुधारणा करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित करा.
- क्रेडिट स्कोअरचा अहवाल तपासा आपला क्रेडिट स्कोअर बरोबर आहे का चूक हे पाहण्यासाठी क्रेडिट अहवाल तपासणे गरजे असते. यात चूक आढळल्यास वेळीच दुरुस्त करुन घ्या.
- तुम्ही कोणालाही गॅरेंटर राहिलात आणि संबंधित व्यक्तीने कर्जाची देयके चुकवली तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होईल.