रेल्वेला भारतीयांची लाईफलाईन समजले जाते. रेल्वे वाहतुकीच्या बाबतीत अमेरिका, रशिया, चीननंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो. आपण रेल्वेने प्रवास करताना डब्यांचे निरीक्षण करतो. रेल्वेच्या डब्यांवर अनेक प्रकारची चिन्ह असतात, या चिन्हांना विशेष अर्थ असतो.
( हेही वाचा : खासगी बसप्रवास महागला; गणेशोत्सवातील कोकणवारी खिशाला भारी)
रेल्वेच्या डब्यावरील ‘X’ आणि ‘LV’ चिन्हांचा अर्थ काय?
भारतात पॅसेंजर ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ‘X’ हे अक्षर लिहिलेले असते. पण हे केवळ इंग्रजीतील एक्स अक्षर नसून यामागे विशिष्ट अर्थ आहे. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार प्रत्येक पॅसेंजर ट्रेनच्या मागच्या बाजूला ‘X’ चिन्ह लिहिणे अनिवार्य आहे. याचा चिन्हाचा अर्थ असा की हा संबंधित ट्रेनचा शेवटचा डबा आहे. हे चिन्ह पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगात असते.
शेवटच्या डब्यावर ‘X’ व्यतिरिक्त बऱ्याचवेळा LV असेही लिहिलेले असते. LV चा फुलफॉर्म Last Vehicle असा आहे. हा रेल्वेचा कोड असून सुरक्षिततेसाठी सुद्धा ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर असे लिहिले जाते. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना सुद्धा कळते की, हा शेवटचा डबा आहे.
ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना पासिंग दरम्यान ‘X’ किंवा ‘LV’ ही अक्षरे दिसली नाहीत तर ट्रेनचे मागील डबे काही कारणास्तव वेगळे झाले आहेत असे समजून रेल्वे स्टाफ अलर्ट होतो.
तसेच मान्सून कालखंडात किंवा खराब हवामानात रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अलर्ट मिळावा यासाठी शेवटच्या डब्यावर लाल रंगाच्या ब्लिंक लाइट लावल्या जातात, ही लाईट ट्रॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना देते.
Join Our WhatsApp Community