मुली एकांतात इंटरनेटवर काय करतात सर्च? गुगलच्या रिपोर्टमधून माहिती समोर

सध्या प्रत्येकजण मोबाईलवर दररोज काही ना काही सर्च करत असतो. यामध्ये पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश असतो. पुरुषांच्या तुलनेत इंटरनेट सर्फिंगचे प्रमाण महिलांमध्ये कमी असली तरी आर्थिक वर्ष 2021 च्या चौथ्या तिमाहीत महिलांच्या संख्येत अल्पशः वाढ झाल्याचे दिसून आले आहे. स्टॅटिस्टा विश्लेषण अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. तसेच मुली किंवा महिला इंटरनेटवर काय सर्च करतात याबाबतची माहिती देखील या अहवालात देण्यात आली आहे.

गुगलने प्रसिद्ध केलेला हा अहवाल 15 ते 34 वयोगटातील महिलांबाबत आहे. या अहवालानुसार महिला आणि मुली ब्युटी टिप्स,करिअर ऑप्शन,ई-कॉमर्स डील या गोष्टी प्रामुख्याने सर्च करत असल्याचे समजते.

ब्युटी टिप्स- आपण सुंदर दिसावं यासाठी महिला या कायमंच सजग असतात. त्यामुळे कोणती सौंदर्य प्रसाधने घ्यावीत, तसेच नितळ कांतीसाठी घरगुती उपाय कोणते आहेत याबाबत महिला इंटरनेटवर सर्च करतात.

करिअर ऑप्शन्स- आपल्या करिअरच्या बाबतही मुली फारच चोखंदळ असतात. त्यामुळे करिअर ऑप्शन्स सर्च करणा-या मुलींची संख्या सर्वाधिक असल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

ई-कॉमर्स खरेदी- शॉपिंग हा महिलांचा आवडता विषय आहे. त्यामुळे कुठलीही वस्तू घेताना महिला त्याबाबत योग्य तो रिसर्च घेतात. किंमतींच्या बाबतीत घासाघीस करण्यामध्येही महिला तरबेज असतात. त्यामुळे कोणत्या वेबसाईटवर ऑफर्स आहेत, कुठे डिस्काऊंट आहे याची माहितीही महिला इंटरनेटवर शोधतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here