What Happens in Muhurat Trading : मूहूर्ताच्या ट्रेडिंगचे सौदे का महत्त्वाचे? ते नेमके कसे पार पडतात?

What Happens in Muhurat Trading : मूहूर्ताचं ट्रेडिंग हे शुभ मानलं जातं 

29
What Happens in Muhurat Trading : मूहूर्ताच्या ट्रेडिंगचे सौदे का महत्त्वाचे? ते नेमके कसे पार पडतात?
What Happens in Muhurat Trading : मूहूर्ताच्या ट्रेडिंगचे सौदे का महत्त्वाचे? ते नेमके कसे पार पडतात?
  • ऋजुता लुकतुके

शेअर बाजारात दलाल आणि गुंतवणूकदार तसंच गुंतवणूकदार संस्थांसाठी मूहूर्ताच्या ट्रेडिंगचं महत्त्व खूप मोठं आहे. सणाचे शुभ दिवस आणि सकारात्मक भावनेतून हे सत्र नियमितपणे आयोजित केलं जातं. या दिवशी गुंतवणूकदार व शेअर बाजाराशी संबंधित सर्व लोक आपली कार्यालय तसंच घरं काही प्रमाणात सजवतात. गुंतवणुकीसाठी वापरले जाणारे संगणक, हिशोबाच्या वह्या यांची पूजा करतात. मग एक तासाच्या या विशेष सत्रात सहभागी होतात. दिवाळीच्या दिवसांत मूहूर्ताचं ट्रेडिंग येतं हा योगायोग आहे. एरवी हिंदू दिनदर्शिका म्हणजेच विक्रम संवतच्या पहिल्या दिवशी हे मूहूर्ताचं ट्रेडिंग केलं जातं. आणि हा दिवस दिवाळीतच येतो. (What Happens in Muhurat Trading)

(हेही वाचा- Ind vs NZ, 3rd Test : मुंबई कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती?)

मुंबई शेअर बाजाराने पहिल्यांदा १९५७ मध्ये अधिकृतपणे एक तासाचं विशेष सत्र यासाठी आयोजित केलं होतं. त्या दिवशी पार पडलेल्या सौद्यांची पूर्तताही त्याच दिवशीपासून होणार होती. म्हणजे शेअर बाजाराचं संपूर्ण कामकाज त्या दिवशी सुरू राहिलं. ३० वर्षांनंतर राष्ट्रीय शेअर बाजारातही ही प्रथा सुरू झाली. (What Happens in Muhurat Trading)

सकारात्मक भावना असल्यामुळे शेवटच्या १७ मूहूर्ताच्या सत्रांमध्ये १४ सत्रांत निर्देशांकांची वाढच झाली आहे. यंदा मूहूर्ताचं ट्रेडिंग हे १ नोव्हेंबरला संध्याकाळी सहा ते सात या वेळेत पार पडणार आहे. त्याचं वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. (What Happens in Muhurat Trading)

(हेही वाचा- Assembly Election : राज्यात 22 लाख 22 हजार 704 नवीन मतदार करणार मतदान)

राष्ट्रीय व मुंबई शेअर बाजारातील मूहूर्त ट्रेडिंगच्या वेळा

१ नोव्हेंबरचं विशेष ट्रेडिंग सत्र

सुरुवातीची वेळ

समाप्तीची वेळ

प्री-ट्रेडिंग सत्र

१७.४५

१८.००

प्रत्यक्ष मूहूर्त ट्रेडिंग

१८.००

१९.००

समाप्तीचं सत्र

१९.००

१९.३०

ब्लॉक डील सत्र

१७.३०

१७.४५

सौद्यांमध्ये बदल करण्याची वेळ

१८.००

१९.३०

 

भारतात मूहूर्ताच्या ट्रेडिंगची मोठी परंपरा आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला नवीन संवत्सर सुरू होत असल्यामुळे देशातील व्यापारी वर्ग या दिवशी आपलं नवीन व्यापारी वर्षं सुरू करतात. आपली जुनी हिशोबाची वही बाजूला ठेवून नवीन वही सुरू करतात. त्या समारंभाला चोपडी पूजन म्हटलं जातं. हिशोबाच्या वह्या पूजण्याबरोबरच लक्ष्मी पूजनही करण्याची पद्धत आहे. पैसे, मालमत्ता म्हणजे लक्ष्मी. आणि तिचं पूजन या दिवशी केलं जातं. (What Happens in Muhurat Trading)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.