गूगलचा ‘सर्च’ आता अधिक अचूक झाला!

आपल्याला नेमके काय सर्च करायचे आहे, हे शब्दांत मांडणे कठीण होते किंवा क्लिष्ट असते तेव्हा ‘एमयूएम’ तुमच्या मदतीला धावू शकते.

154

अनेकदा आपल्याला काही गोष्टीची माहिती जाणून घ्यायची असते, मात्र नेमकी शब्द रचना अवगत नसते, त्यामुळे विविध प्रश्न मांडून आपण माहिती जमवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तरीही नेमक्या माहिती पर्यंत आपल्याला पोहचता येत नाही, अशावेळी ही समस्या सोडवण्यासाठी गूगलने नवीन पर्याय शोधला आहे. त्यासाठी गुगलने आता गुगल मल्टिटास्क युनिफाइड मॉडेल (एमयूएम) हे अपडेट दिले आहे. त्यामाध्यमातून माहिती शोधणाऱ्या त्याने केवळ संबंधित ठिकाण अथवा वस्तूंचा उल्लेख केला तरी त्यांची सविस्तर माहिती समोर येणार आहे.

शोधाचा आवाका वाढला!

गूगलचे सर्च इंजिन हा एक प्रकारे माहितीच्या महाजालाचा वाटाड्या आहे. इंटरनेटच्या अमर्याद विश्वात एखादी गोष्ट शोधायची म्हणजे वाळवंटात सुईचा शोध घेण्यासारखे आहे. अशा वेळी ‘सर्च इंजिन’ आपल्याला योग्य मार्गापर्यंत नेते. त्यातही ‘गूगल’च्या सर्च इंजिनचा आवाका अधिकच मोठा आहे. इंटरनेटचे विश्व जितके विस्तारत जात आहे. तितकेच गूगलचे सर्च इंजिनही अधिकाधिक समृद्ध होत आहे. प्रत्यक्ष शब्द टाइप करून किंवा मायक्रोफोनद्वारे बोलून आपल्याला हवे त्याचा इंटरनेट शोध घेणे सहजसोपे होते. आता या शोधमोहिमेसाठी गुगलने आणखी एका तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ च्या आधारे सर्च करण्याची सुविधा गूगलने अपडेटद्वारे उपलब्ध करून दिली आहे.

(हेही वाचा : अनिल परबांचे कार्यालय तोडायची ऑर्डर आली…रामदास भाई म्हणाले ‘वाव…व्हेरी गुड!’)

७५ भाषा अवगत 

ऑनलाइन सर्च क्षमता आर्टिफिशियल इंटिलिजन्सने सज्ज अल्गोरिदमने वाढवण्यासाठी ‘एमयूएम’ची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्याला नेमके काय सर्च करायचे आहे, हे शब्दांत मांडणे कठीण होते किंवा क्लिष्ट असते तेव्हा ‘एमयूएम’ तुमच्या मदतीला धावू शकते. ‘एमयूएम’ केवळ भाषाच ओळखू शकत नाही तर तुम्हाला नेमके काय शोधायचे आहे, याचा अंदाजही मांडते. त्याला ७५ भाषा अवगत असल्यामुळे यावर सर्च करताना भाषेचा अडथळाच येत नाही. गुगलच्या आधीच्या कोणत्याही सर्च मॉडेलच्या तुलनेत एक हजार पट अधिक वेगाने ‘एमयूएम’ कार्य करते. केवळ शब्दच नव्हे तर चित्रांच्या माध्यमातूनही ते अचूक शोध घेण्यास मदत करते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.